धाराशिव: धाराशिव जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला असून, जिल्ह्याच्या 'मिनी मंत्रालया'वर महायुतीने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत महायुतीच्या घटकपक्षांनी ५५ पैकी तब्बल ४० जागांवर विजय मिळवत सत्ता काबीज केली आहे. दुसरीकडे, काँग्रेस आणि उद्धवसेनेच्या महाविकास आघाडीला केवळ १० जागांवर समाधान मानावे लागले असून, त्यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे.
भाजपची १९ जागांसह मोठी झेप महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला असून त्यांनी १९ जागांवर विजय मिळवला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने (शिंदेसेना) १५ गटांत यश मिळवून जिल्ह्यावर आपली पकड मजबूत केली आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने ६ जागांवर बाजी मारली आहे. या त्रिकुटाच्या एकत्रित ताकदीमुळे महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे.
महाविकास आघाडीची पीछेहाट निवडणूक पूर्व आघाडी करून मैदानात उतरलेल्या उद्धवसेना आणि काँग्रेसला अपेक्षित यश मिळाले नाही. उद्धवसेनेला अवघ्या ७ जागा मिळाल्या असून नगरपालिका निवडणुकीनंतर पुन्हा एकदा त्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. काँग्रेसच्या पदरीही केवळ ३ जागा पडल्या आहेत. या निकालामुळे जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
४ जागांवर अपक्षांचा विजयविशेष म्हणजे, या निवडणुकीत ४ जागांवर अपक्षांनी विजय मिळवला असून, समाजवादी पक्षानेही एका जागेवर विजय मिळवत जिल्हा परिषदेत आपले खाते उघडले आहे. या विजयानंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जिल्ह्याभरात गुलालाची उधळण करत मोठा जल्लोष साजरा केला.
Web Summary : The Mahayuti alliance triumphed in the Dharashiv Zilla Parishad elections, securing a historic victory with 40 out of 55 seats. The BJP emerged as the largest party. The Maha Vikas Aghadi, consisting of Uddhav Sena and Congress, suffered a significant setback, winning only 10 seats. Four independents also won.
Web Summary : धाराशिव जिला परिषद चुनावों में महायुति गठबंधन ने ऐतिहासिक जीत हासिल की, 55 में से 40 सीटें जीतीं। बीजेपी सबसे बड़ी पार्टी बनकर उभरी। उद्धव सेना और कांग्रेस वाली महा विकास अघाड़ी को करारा झटका लगा, केवल 10 सीटें मिलीं। चार निर्दलीय भी जीते।