शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

बळीराजाची लोकशाहीला अनोखी सलामी! मतदान केंद्राच्या प्रवेशद्वारावर बांधले 'कांद्याचे तोरण'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 13:39 IST

मतदारांनी या तोरणासोबत सेल्फी घेत "लोकशाही आणि शेती" यांचा हा सुंदर संगम सोशल मीडियावर शेअर केला.

- बालाजी बिराजदारलोहारा (जि. धाराशिव): जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी आज शनिवारी सर्वत्र उत्साहात मतदान पार पडत आहे. मात्र, लोहारा तालुक्यातील सालेगाव येथील मतदान केंद्रावर एक अतिशय वेगळे आणि हृदयस्पर्शी दृश्य पाहायला मिळाले. येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होताना चक्क कांद्याचे तोरण बांधून आपल्या कृषी संस्कृतीचा आणि कष्टाचा सन्मान केला आहे.

"माझा गाव, माझा अभिमान" सालेगाव हे तालुक्यात प्रगत कांदा उत्पादक गाव म्हणून ओळखले जाते. शेतकऱ्यांसाठी कांदा हे केवळ पीक नसून त्यांच्या जीवनाचे अर्थकारण आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहे. त्यामुळेच, सालेगावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर येणाऱ्या मतदारांचे स्वागत करण्यासाठी गावकऱ्यांनी फुलांच्या ऐवजी आपल्या कष्टाचे प्रतीक असलेल्या कांद्याचे तोरण प्रवेशद्वारावर लावले.

सोशल मीडियावर फोटो व्हायरल मतदानासाठी येणारे नागरिक या अनोख्या तोरणाकडे कुतूहलाने पाहत होते. अनेक तरुण मतदारांनी या तोरणासोबत सेल्फी घेत "लोकशाही आणि शेती" यांचा हा सुंदर संगम सोशल मीडियावर शेअर केला. "लोकशाहीचा हक्क बजावताना आम्ही आमच्या मातीशी आणि कष्टाशी असलेले नाते कधीच विसरत नाही," अशी भावना एका स्थानिक शेतकऱ्याने व्यक्त केली.

प्रशासनाचे देखील कौतुकप्रशासकीय अधिकारी आणि पोलिसांनीही सालेगावकरांच्या या कल्पकतेचे कौतुक केले आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असताना, सालेगावच्या या 'कांदा तोरणा'ने मात्र एक सकारात्मक  संदेश दिला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Farmer's unique salute to democracy: Onion garland at polling station!

Web Summary : In a unique display, farmers in Salegaon, Maharashtra, honored their agricultural heritage by adorning a polling station entrance with an onion garland, symbolizing their hard work and connection to the land during local elections.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६parabhaniपरभणी