शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

Dharashiv: मुलीच्या इंजिनिअरिंग प्रवेशासाठी पैसे नव्हते, नैराश्यात शेतकऱ्याने संपवलं जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 17:00 IST

मुलीला बाहेर ठेवून शिक्षणाचा खर्च कसा पेलणार, या विवंचनेतून संपवले जीवन

तेर (जि. धाराशिव) : डोक्यावर आधीच कर्जाचा डोंगर, त्यात पुढे हुशार मुलीच्या उच्च शिक्षणाचा संभाव्य खर्च, या विवंचनेतून धाराशिव तालुक्यातील डकवाडी येथील शेतकरी अमोल नवनाथ डक (३८) या शेतकऱ्याने राहत्या घरीच गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी ७ वाजता कुटुंबीयांच्या निदर्शनास आली. याप्रकरणी ढोकी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली आहे.

अमोल डक हे शेती कसून त्यावर आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवीत होते. सोमवारी रात्री नेहमीप्रमाणे सर्वांची जेवणे झाल्यानंतर ते १०:३० वाजता झोपण्यासाठी गेले. यानंतर घरातील सर्वजण झोपी गेल्यानंतर त्यांनी साडीच्या साहाय्याने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी कुटुंबीय उठल्यानंतर ७ वाजता हा प्रकार सर्वांच्या लक्षात आला. त्यांचे नातेवाईक विनोद डक यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर ढोकी पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून अकस्मात मृत्यूची नोंद घेतली आहे.

विनोद डक यांच्या माहितीनुसार अमोल डक यांच्या मुलीची बारावी झाली होती. सीईटीत चांगले गुण मिळाल्याने तिला इंजिनिअरिंगला प्रवेश घ्यायचा होता. मात्र, अमोल डक यांच्यावर आधीच बँकेचे कर्ज होते. त्यात पुन्हा मुलीला बाहेर ठेवून शिक्षणाचा खर्च कसा पेलणार, या विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या नोंदीत आहे.

कुटुंबकर्ताच गेलामृत अमोल डक यांच्यावर पूर्ण कुटुंबाची जबाबदारी होती. पत्नी, एक मुलगा, एक मुलगी व थकलेले वृद्ध आई-वडील, असा परिवार त्यांच्यामागे राहिला आहे. अमोल हे शेती करून त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर मुलांचे शिक्षण व कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवीत होते.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याdharashivधाराशिव