शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Dharashiv: लोहाऱ्याचा 'हायटेक' विक्रम! एका दिवसात ४४ ग्रामपंचायतींच्या वेबसाईट लाँच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 18:18 IST

गावकऱ्यांसाठी क्यूआर कोड, ऑनलाइन टॅक्स आणि मोबाईल ॲप;  लोहारा तालुक्याने बदलला गावचा चेहरा.

- बालाजी बिराजदारलोहारा ( जि. धाराशिव ) : तालुक्यातील सर्व ४४ ग्रामपंचायती आता स्वतंत्र वेबसाईटसह ऑनलाइन झाल्या असून, हा विक्रम घडवणारा लोहारा तालुका महाराष्ट्रातील पहिला हायटेक तालुका ठरला आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज योजनेच्या अनुषंगाने धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या प्रेरणेतून गटविकास अधिकारी जगदेव वग्गे यांनी हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवला आहे.

यशदाचे मास्टर ट्रेनर मारुती बनसोडे यांच्या माध्यमातून अभिनव आयटी सोल्युशन प्रा. लि. पुणेचे कार्यकारी संचालक प्रा. मुरलीधर भुतडा यांच्याशी संपर्क साधण्यात आला. निडली हायटेक ग्रामपंचायत या प्रकल्पाच्या अनुभवावर आधारित या कंपनीने स्वतःच्या सीएसआर फंडातून सर्व ग्रामपंचायतींना मोफत वेबसाईट उपलब्ध करून दिल्या. विशेष म्हणजे फक्त एका दिवसात या सर्व वेबसाईट्स तयार करण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायत अधिकारी व संगणक चालक यांना ऑनलाइन प्रशिक्षण देऊन स्वतःच्या हाताने वेबसाईट कशी तयार करावी याचे मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर काही तासांतच सर्व ग्रामपंचायतींनी त्यांच्या वेबसाईटवर माहिती अपलोड करून साइट कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.हा डिजिटल उपक्रम केवळ वेगळेपणाच नव्हे तर मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज योजनेच्या मूल्यांकनामध्ये अतिरिक्त १० ते १५ गुण मिळवण्यास मदत करणार असल्याने त्याचे महत्त्व अधिक अधोरेखित होते.

या कामात अति. मुख्य कार्यकारी अधिकारीअनुप शेंगुलवार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.)अनंत कुंभार,विस्तार अधिकारी सतीश शटगार, ग्रामपंचायत अधिकारी युनियनचे जिल्हाध्यक्ष महादेव जगताप तालुक्यातील सर्व सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, अधिकारी व कर्मचारी तसेच तालुका व्यवस्थापक विकास पवार यांचे मोलाचे योगदान लाभले.

ग्रामपंचायतच्या 'या' सुविधा मिळणारप्रत्येक ग्रामपंचायतीची स्वतंत्र वेबसाईट,हायटेक ॲडव्हान्स मॉड्यूल्सची जोड,प्रत्येक घरासाठी क्युआर कोड व्यवस्था,ऑनलाईन टॅक्स भरण्याची सुविधा नागरिकांसाठी Alerto SOS ॲप विद्यार्थ्यांसाठी दरमहा स्पर्धात्मक ऑनलाईन प्रश्नपत्रिका,शासकीय योजनांची माहिती मोबाईलवर उपलब्ध,सरपंच व सदस्यांना थेट संपर्कासाठी ऑटोमेटेड व्हाट्सअप सेवा,ऑनलाईन तक्रार नोंदणी व दाखले मिळविण्याची सोय,मोबाईल ॲपमधून ग्रामपंचायत व्यवस्थापन व सर्व १ ते ३३ नमुन्यांचे डिजीटल नियोजन

 ४४ ग्रामपंचायती ऑनलाइनजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या प्रेरणेतून लोहारा तालुक्यातील सर्व ४४ ग्रामपंचायतींना एकाच वेळी डिजिटल सुविधा उपलब्ध करून देणे हा ऐतिहासिक टप्पा आहे. ग्रामपंचायतींच्या विकासात तंत्रज्ञानाची जोड मिळाल्याने पारदर्शकता वाढेल आणि गावोगावी नवी संधी निर्माण होतील.जगदेव वग्गे,गटविकास अधिकारी,पंचायत समिती,लोहारा

कार्यक्षमता वाढेलग्रामपंचायतींचे कामकाज पूर्णपणे ऑनलाइन होत आहे. नागरिकांना दाखले, कर, तक्रारी व शासकीय सेवा घरबसल्या मिळणार आहेत. यामुळे ग्रामपंचायतींची कार्यक्षमता अधिक वाढेल.- एम. टी. जगताप, ग्रामपंचायत अधिकारी, एकोंडी (लो), ता. लोहारा

अभिमानाची बाबगावाची स्वतंत्र वेबसाईट ही प्रत्येक गावकऱ्याच्या अभिमानाची बाब आहे. डिजिटल माध्यमातून गावाचे नाव राज्यभर पोहोचेल व नागरिकांचा सहभाग अधिक वाढेल.- वैभव पवार, सरपंच,माळेगाव, ता. लोहारा

टॅग्स :dharashivधाराशिवgram panchayatग्राम पंचायतdigitalडिजिटल