शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

भयंकर! पत्नीला संपवलं, पोटच्या मुलीवरही चालवली कुऱ्हाड; मुलगा बाहेर पळाल्याने बचावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 15:21 IST

मध्यरात्री संतापलेल्या बापाने संपवले कुटुंब; पत्नी आणि चिमुकलीचा खून करून पती पोलिसांत हजर

उमरगा (जि. धाराशिव): उमरगा तालुक्यातील मुरूम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेरडवाडी येथे सोमवारी मध्यरात्री रक्ताच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. अजित अणप्पा वासुदेव (वय ३०) याने किरकोळ वादातून आपली पत्नी लिंबाबाई (वय २४) आणि ८ वर्षांची मुलगी मानसी यांची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे, दुहेरी हत्याकांड घडवल्यानंतर आरोपी अजित मंगळवारी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास स्वतःहून मुरूम पोलीस ठाण्यात हजर झाला आणि त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.

४ वर्षांचा मुलगा घराबाहेर पळाला आणि वाचलामिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री उशिरा अजित आणि त्याची पत्नी लिंबाबाई यांच्यात जोरात भांडण सुरू झाले. वादाचे रूपांतर हिंसाचारात झाले आणि अजितने घरात असलेल्या कुऱ्हाडीने पत्नी व मुलीवर सपासप वार केले. यावेळी त्यांचा ४ वर्षांचा लहान मुलगा घरातच होता, मात्र भांडण आणि रक्ताचा सडा पाहून तो प्रचंड घाबरला आणि घराबाहेर पळाला, ज्यामुळे त्याचे प्राण सुदैवाने वाचले. अजितला एकूण दोन मुली आणि एक मुलगा असून मोठी मुलगी आजोळी असल्याने ती या संकटातून बचावली आहे.

पोलिसांकडून तपास सुरू, हत्येचे कारण अस्पष्टघटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक रितू खोकर आणि उपविभागीय अधिकारी सदाशिव शेलार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सपोनि संदीप दहिफळे यांनी मृतदेहांचा पंचनामा करून ते शवविच्छेदनासाठी मुरूम येथील शासकीय रुग्णालयात पाठवले आहेत. आरोपीने एवढे टोकाचे पाऊल नेमके कोणत्या कारणातून उचलले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मंगळवारी उशिरापर्यंत गुन्ह्याची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. कौटुंबिक कलह की संशयाचे भूत, या दिशेने पोलीस आता सखोल तपास करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Horror in Dharashiv: Man Murders Wife, Daughter; Son Escapes

Web Summary : In Dharashiv, a man brutally murdered his wife and daughter with an axe following a domestic dispute. Their young son escaped, while the motive remains unclear as police investigate the horrific crime.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdharashivधाराशिव