शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

धाराशिव लोकसभेसाठी महायुतीचा उमेदवार ठरला; अर्चना पाटील राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2024 14:23 IST

गेल्या पंधरा दिवसापासून महायुतीच्या जागा वाटपात धाराशिव लोकसभेचा मतदारसंघावर शिवसेना भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षाने आपला दावा सांगितला होता.

- शहाजी फुरडे-पाटील

बार्शी: गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या धाराशिव लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. महायुतीमध्ये हा मतदारसंघ अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसला सुटला असून या ठिकाणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी आणि धाराशिव जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष अर्चना पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले आहे.

गेल्या पंधरा दिवसापासून महायुतीच्या जागा वाटपात धाराशिव लोकसभेचा मतदारसंघावर शिवसेना भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षाने आपला दावा सांगितला होता. दररोज नवीन नाव चर्चेसाठी पुढे येत होते. मात्र मागील तीन-चार दिवसापासून चर्चेच्या हालचालींना वेग आला. यामध्ये धाराशिव मतदार संघातील प्रमुख नेते मंडळींची उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दोन दिवस  झालेल्या चर्चेनंतर अर्चना पाटील यांचे नाव फायनल झाले. त्यामुळे त्या शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांना लढत देणार आहेत. 

अर्चना पाटील यांनी यापूर्वी धाराशिव जिल्हा परिषद उपाध्यक्षपद भूषवले आहे. मतदारसंघांमध्ये असलेल्या सहा विधानसभा मतदारसंघापैकी तीन विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. तर शिवसेना शिंदे गटाचे दोन आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा एक आमदार या मतदारसंघात आहे. त्यामुळे समसमान बलाबल असलेल्या या मतदारसंघात पुन्हा एकदा पारंपारिक लढत पाहावयास मिळणार आहे. 

मतदारसंघांमध्ये असलेले राणा पाटील व माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांचे वलय व जातीय समीकरणांचा विचार करता अर्चना पाटील हा फ्रेश चेहरा महायुतीने सर्व बाजूंचा मैदानात उतरवला आहे. त्यांच्या उमेदवारीची अद्याप अधिकृत घोषणा झाली नसली तरी दुपारनंतर अधिकृतरित्या राष्ट्रवादी काँग्रेस कडून पाटील यांची उमेदवारी जाहीर होईल असे खात्रीशीर वृत्त आहे.

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Osmanabadउस्मानाबाद