सापनाई-शेलगाव (दि) रस्त्याच्या कामास प्रारंभ
कळंब : तालुक्यातील सापनाई ते दिवाणे शेलगाव या रस्त्यावर जागोजागी मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे शेलगावसह दहिफळ, सापनाई येथील ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत होता. शेलगाव ग्रामस्थांना दवाखाना, शाळा, मुख्य बाजारपेठ दहिफळ येथे आहे. मात्र, रस्त्याअभावी वाहतुकीसाठी जास्त भाडे आकारले जात होते. नादुरुस्त रस्त्यामुळे एसटीची वाहतूक देखील बंद झाली होती. अखेर या रस्त्याच्या कामास प्रशासनाने सुरूवात केली असून, बांधकाम विभागाचे उपअभियंता एम. बी. कोरडे, कनिष्ठ अभियंता ए. व्ही. क़ाळे यांनी याची पाहणी केली.
ढोकी ग्रामस्थांकडून देशमुख यांचा सत्कार
ढोकी : येथील अमृता अमरसिंह देशमुख यांची मुंबई येथील जिल्हा पोलिस मुख्यालयात उपनिरीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सरपंच गुणवंतरव देशमुख, खरेदी-विक्रीसंघाचे चेअरमन अनंतराव देशमुख, शालिनीताई देशमुख, पं. सदस्य संग्राम देशमुख, पांडुरंग वाकुरे, गुणवंत देशमुख, भारत देशमुख, गोरख माळी, भारत माळी, निहाल काझी, प्रमोद देशमुख आदी उपस्थित होते.
चालकावर गुन्हा
उमरगा: येथील गणेश सूर्यवंशी हे ७ एप्रिल रोजी उमरगा रस्त्यावर रहदारीस व मानवी जिवीतास धोका होईल, अशा पध्दतीने ऑटोरिक्षा उभा करून थांबले होते. या कृतीतून त्यांनी भादंसं कलम २८३ चे उल्लंघन केल्याने त्यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुधभाते यांचे यश
गुंजोटी : येथील श्रीकृष्ण महाविद्यालयातील इतिहास विषयाचे सहशिक्षक विकास दुधाते हे राज्य पात्रता परीक्षेत (सेट) इतिहास विषयात उत्तीर्ण झाले. याबद्दल संस्था सचवि डॉ. दामोदर पतंगे, अध्यक्ष विभावरी शाईवाले, उपाध्यक्ष प्रभाकरराव हिरवे, प्राचार्य डॉ. डी. आर. कुलकर्णी आदींनी त्यांचे कौतुक कले.
बेफिकीरी कायम
उस्मानाबाद : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. सद्यस्थितीत रुग्णांना दाखल करण्यासाठी रुग्णालयात बेड देखील शिल्लक नाहीत,अशी स्थिती आहे. असे असतानाही अनेक नागरिक मात्र अजूनही कोरोना संबंधिच्या नियमांकडे दुर्लक्ष करीत बेफिकीरपणे वागत आहेत.
५४३ जणांना लस
(लसीचा लोगो किंवा फोटो)
तेर : उस्मानाबाद तालुक्यातील जागजी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात २५ दिवसांत ५४३ नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली. वैद्यकीय अधिकारी डॉ. दिव्या इंगळे, डॉ. निशा रोकडे यांच्यासह साथरोग तज्ज्ञ नागलबोणे आदी कर्मचारी यासाठी परिश्रम घेत आहेत.
पुस्तके भेट
(फोटो : दयानंद काळुंके ०९)
अणदूर : येथील शिक्षक खंडेराव कांबळे यांनी वडिलांच्या स्मरणार्थ केशव वाचनालयास २० पुस्तकांचा संच भेट देऊन वर्षभर वाचनालयास एक वृत्तपत्र देण्याचा संकल्प केला. यावेळी संस्थाध्यक्ष उमाकांत करपे, सचिव साहेबराव घुगे, म्हाळाप्पा घोडके, चेतन तोग्गी, अनिरुद्ध कांबळे उपस्थित होते.