तालुक्यातील विधवा परितक्त्या, प्रौढ कुमारिका यांना पेन्शन चालू करून ५० हजार रुपये वार्षिक उत्पन्नाची अट लागू करावी, त्यांना रेशनकार्ड द्यावे, शासकीय पडीक गायराने, धार्मिक स्थळे, गावठाणमध्ये बेघरांनी बांधलेली घरे व केलेली अतिक्रमणे नियमित करून ग्रामपंचायत मिळकती आठ 'अ'ला घेऊन मालकी हक्क द्यावा, देण्यात दसमेगाव, गोजवडा, पिंपळगाव, (लिंगी), ब्रह्मगाव, लाखनगाव, बावी, डोंगरेवाडी आदी गावातील भूमिहीन शेतमजुरांना १९९८ पासून केलेले अतिक्रमण कायम करून उभ्या पिकांचा पंचनामा करून ७/१२ देण्यात यावा, आदी मागण्या या निवेदनात केल्या आहेत. नायब तहसीलदार वृषाली केसकर व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नामदेव राजगुरू यांना हे निवेदन देण्यात आले. यावेळी जाणीव संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ लगाडे, हानिफ लोहार, ज्ञानोबा पवार, रामलिंग घुले आदी उपस्थित होते.
थकीत पेन्शन वाटप करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:35 IST