शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

उमरग्यात सतत गैरहजर असणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला नगरसेवकांनी घातला हार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 18:48 IST

मुख्याधिकारी येत नसल्याने पालिकेच्या कामकाजात विस्कळीतपणा आला आहे.

उमरगा (उस्मानाबाद ) : येथील नगर पालिकेचे मुख्याधिकारी सतत गैरहजर राहत असल्याने शहरातील विकास कामांवर परिणाम झाला आहे़ त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसेनेच्या नगरसेवक, कार्यकर्त्यांनी आज दुपारी मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार घालून गांधीगिरी करीत निषेध नोंदविला़

उमरगा पालिकेचे मुख्याधिकारी प्रकाश पाटील मागील एक महिन्यापासून वैद्यकीय रजेवर आहेत़ त्यामुळे परंड्याचे मुख्याधिकारी दीपक इंगोले यांच्याकडे पदभार देण्यात आला आहे़ मात्र, परंडा शहर हे उमरगा शहरापासून जवळपास दीडशे किलोमीटर दूर आहे़ त्यामुळे इंगोले हे महिनाभरात एकदाच उमरगा पालिकेत आले आहेत़ काही महत्वाची कामे, कागदपत्रांवर स्वाक्षरी करायची असल्यास उस्मानाबाद येथे कर्मचाऱ्यास बोलावून ते कामे करीत आहेत. मुख्याधिकारी येत नसल्याने पालिकेच्या कामकाजात विस्कळीतपणा आला आहे.

शहरातील विकासकामे, मुलभूत सोयी-सुविधांचा प्रश्न निर्माण झाला आहे़ विकास कामांचे नियोजन, मुलभूत सोयी-सुविधांच्या प्रश्नावर निर्णय घेण्यासाठी जबाबदार अधिकारी नसल्याने दाद मागायची कोणाकडे ? असा प्रश्न शहरवासियांना पडला आहे़ मुख्याधिकारी पालिकेत येत नसल्याने निर्माण होणाऱ्या समस्या पाहता शिवसेनेचे नगरसेवक पंढरीनाथ कोणे यांनी मंगळवारी दुपारी कार्यकर्त्यांसमवेत मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालय गाठले़ तेथे मुख्याधिकाऱ्यांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून गांधीगिरी करीत निषेध व्यक्त केला़ यावेळी रत्नाकर सगर, युवा सेनेचे संदीप चौगुले व कार्यकर्ते उपस्थित होते़

शहरवासियांना वेठीस धरू नयेमुख्याधिकारी प्रकाश पाटील यांना उमरगा पालिकेच्या मुख्याधिकारी पदाचा भार संभाळण्यात स्वारस्य नसेल तर त्यांनी इतर ठिकाणी जावे़ विनाकारण शहरवासियांना वेठीस धरू नये़ पालिकेचा पदभार घेतल्यापासून ते सतत कोणत्या न कोणत्या कारणाने बाहेरच राहिले असल्याचे शिवसेनेचे नगरसेवक पंढरीनाथ कोणे म्हणाले़.

टॅग्स :agitationआंदोलनOsmanabadउस्मानाबादMuncipal Corporationनगर पालिका