शहरं
Join us  
Trending Stories
1
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
2
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
3
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
4
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
5
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
6
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
7
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
8
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
11
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
12
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?
13
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
14
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
15
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
16
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
17
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
18
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
19
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
20
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!

coronavirus: काेराेना बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा गुरुजी घेणार शाेध!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2021 05:15 IST

उस्मानाबाद जिल्ह्यात काेराेना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ हाेऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर शाळा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद तसेच खासगी शाळांवरील शिक्षकांच्या मदतीने आता गावागावांतील काेराेना बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शाेध घेण्यात येणार आहे.

उस्मानाबाद : जिल्ह्यात काेराेना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ हाेऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर शाळा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद तसेच खासगी शाळांवरील शिक्षकांच्या मदतीने आता गावागावांतील काेराेना बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शाेध घेण्यात येणार आहे. एवढेच नाही तर डाेअर-टू-डाेअर जाऊन काेराेनाच्या अनुषंगाने जनजागृती करणे, लाेक मास्क वापरताहेत की नाही, यावरही लक्ष ठेवण्याची जबाबदारी सीईओ डाॅ. विजयकुमार फड यांनी शिक्षकांवर साेपविली आहे.मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात प्रतिदिन दाेनशे ते सव्वादाेनशे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून विविध उपाययाेजना हाती घेतल्या आहेत. एखाद्या गावातील वाॅर्डात वा प्रभागात काेराेनाग्रस्त आढळून आल्यास संबंधिताच्या संपर्कात नेमके काेण-काेण आले हाेते, हे शाेधणे अत्यंत गरजेचे असते. हे काम सध्या आराेग्य यंत्रणेच्या माध्यमातून केले जात आहे. परंतु, दिवसागणिक वाढणारी रुग्णसंख्या लक्षात घेता, ही यंत्रणा पुरेशी नाही. त्यामुळेच मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. विजयकुमार फड यांनी जिल्हा परिषद तसेच खासगी शाळांतील शिक्षकांची या कामात मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. हे काम चाेख पार पाडले जावे, यासाठी जिल्हा, तालुका तसेच गावपातळीवर स्वतंत्र कमिट्या असणार आहेत. या कामाचे थेट सीईओंना रिपाेर्टिंग केले जाणार आहे.   साेलापूरच्या धर्तीवर उपक्रम उस्मानाबादला लागून असलेल्या साेलापूर जिल्हा परिषदेकडून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.  या माध्यमातून बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शाेध घेणे, चाचणी करण्यास भाग पाडणे, नियमांची अंमलबजावणी हाेते की नाही, यावर लक्ष ठेवले जात आहे.  साेलापूर जिल्ह्यातील शिक्षकांकडून या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सूत्रांनी सांगितले. समाजामध्ये शिक्षकांना मानाचे स्थान आहे. हीच बाब लक्षात घेऊन काेराेनाच्या अनुषंगाने जनजागृती करणे, बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शाेध घेऊन त्यांना किमान टेस्ट करून घेण्यासाठी प्राेत्साहित केल्यास लाेक निश्चित ऐकतील. आराेग्य यंत्रणेला त्याची निश्चित मदत हाेईल. - डाॅ. विजयकुमार फड, सीईओ, जिल्हा परिषद, उस्मानाबाद

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसOsmanabadउस्मानाबादTeacherशिक्षक