शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: गर्दी जमवून वाढदिवस साजरा करणं महागात पडले; दोघा महंतांसह सातजणांविरूद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 17:44 IST

तुळजापूरात जमावबंदी आदेशाचे केले उल्लंघन, कार्यक्रमाचा व्हीडिओ व्हायरल झाल्याने प्रकार उजेडात

उस्मानाबाद : वाढदिवस साजरा करून फेसबुकवर व्हीडिओ अपलोड करणे श्री तुळजाभवानी देवीच्या दोन महंतांसह अन्य पाच व्यक्तींच्या चांगलेच अंगलट आले आहे. जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी तुळजापूर ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक विकास दांडे यांच्या फिर्यादीवरून १२ एप्रिल रोजी संबंधितांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. तसेच जिल्हाधिकाºयांनीही जमावबंदी आदेश लागू केला आहे. हे माहित असतानाही तुळजापूर येथील महंत तुकोजी बुवा यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त १० एप्रिलच्या सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास ढेकरी परिसरातील शेतात विशाल रोचकरी, संजय पवार व इतर पाचजणांना एकत्र केले. तोंडाला कोणत्याही प्रकारचे मास्क वा तत्सम साहित्य न बांधता तसेच सोशल डिस्टन्सिंग न राखता वाढदिवसाचा केक कापला. या कार्यक्रमाची जवळपास ११ सेकंदाची व्हीडिओ क्लिप तयार करून सूरज जगताप या नावाने असलेल्या फेसबुक अकाऊंटवर अपलोड केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार तुळजापूर ठाण्यातील गोपनीय शाखेचे पोना अमोल कलशेट्टी, रवी भागवत यांनी सदरील प्रकरणाची माहिती घेतली असता, त्यांची खात्री पटली. यानंतर फेसबुकवरून संबंधित व्हीडिओ क्लिप डाऊनलोड करून ती तपासली असता, सदरील कृत्य जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची  पायमल्ली करणारे असल्याच्या निष्कर्षापर्यंत ते पोहोचले. यानंतर पोलीस उपनिरीक्षक विकास दांडे यांच्या फिर्यादिवरून महंत तुकोजी बुवा, महंत वाकोजी बुवा, विशाल रोचकरी, संजय पवार यांच्यासह इतर तीन लोकांविरुद्ध कलम १८८, २६९ महाराष्ट्र कोविड-१९ उपाययोजना नियम-२०२० कलम ११ अन्वये १२ एप्रिल रोजी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Policeपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्या