शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

CoronaVirus : ७० वर्षीय शेतकऱ्याची आभाळमाया; घरोघरी जाऊन २०० गरीब कुटुंबांना केली अन्नधान्याची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2020 2:49 PM

तांदूळ आणि साखरेचे केले वाटप

ठळक मुद्देकाम बंद असल्याने गरिबांची परवड

- बालाजी बिराजदारलोहारा (जि.उस्मानाबाद) : कोरोना संसर्ग विषाणूच्या पार्श्वभूमीवर गरीबांची उपासमार होऊ नये, यासाठी अनेकांचे हात मदतीसाठी पुढे येत आहेत.त्यातच लोहारा तालुक्यातील कानेगाव येथील ७० वर्षीय वृध्द शेतकऱ्यांने आपली आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही गावातील दोनशे गरीब कुटुंबांना पंधरा दिवस पुरेल इतके तांदुळ,साखरेचे वाटप करून आपली सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.          लोहारा तालुक्यातील कानेगाव येथे रघुनाथ यादवराव कदम (वय ७०) हे आपल्या कुटुंबासोबत राहातात. त्यांना दोन मुल व एक मुलगी असा परिवार आहे. त्यांना केवळ चार एकर शेतजमिन आहे. या चार एकर शेतीवरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. त्यामुळे कुटुंबाची परिस्थिती अगदी बेताचीच आहे. त्यात रघुनाथ कदम यांनी वयाची सत्तरी ओलांडली असली तरीही शेतात काबाडकष्ट आज ही ते करत आहेत. शेतातून मिळालेल्या उत्पन्नातून काही वाटा सामाजिक कामासाठी काढून ठेवतात. सध्या कोरोनासारख्या महामारीने जगाला विळखा घेतला आहे. या कोरोना संसर्गाचा वाढता प्रदुर्भावा रोखण्यासाठी देश,राज्य लॉकडाऊन करुन सिमा सिल करण्यात आल्या आहे. यामुळे सगळेच उद्योग, व्यवसाय बंद झाली आहेत. त्याचा ग्रामीण भागात अधिक प्रभाव पडल्यामुळे गरीबांच्या हाताला काम मिळत नाही. ज्यांचे हातावर पोट आहे. अशा अत्यंत गरीब कुटुंबाला उपासमारीला सामोरे जावे लागत आहे. 

 तालुक्यातील कानेगाव येथे हातावर पोट असणाऱ्या कुटुंबांची संख्या अधिक आहे. मागील पंधरा दिवसापासून काम बंद असल्याने येथील गरीबांची परवड होत आहे. ही बाब लक्षात येताच रघुनाथ कदम यांनी गावातील सुमारे २०० गरीब कुटुंबांना पंधरा दिवस पुरेल इतके तांदुळ, साखरेचे वाटप करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार अन्नधान्याची खरेदी केली. बुधवारी टमटममध्ये धान्य टाकून प्रत्येक कुटुंबाच्या घरोघरी जावून अन्नधान्याचे वाटप केले. यावेळी नारायण लोभे,विवेक बनसोडे, गोविंद कदम,कृष्णा कदम,हरिभाऊ क्षीरसागर आदी उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसOsmanabadउस्मानाबाद