निर्दोष सुटण्यामागे ही आहेत कारणे...
आरोपी निर्दोष सुटण्यांचे प्रमाण हे दोष सिद्ध होण्यापेक्षाही जास्त आहे. मात्र, उस्मानाबादेत हे प्रमाण राज्याच्या तुलनेत चांगलेच कमी आहे. निर्दोष सुटणाऱ्या खटल्यांमध्ये फितुरी हे एक प्रमुख कारण आहे. सुनावण्या सुरू असताना फिर्यादी, फिर्यादी पंच, साक्षीदार फितूर होण्याचे प्रमाण ८० टक्केपर्यंत गेले आहे. अगदी गत महिन्यात न्यायालयात २५ खटले निर्दोष निघाले. यातील २१ प्रकरणात फितुरी झाली. २ प्रकरणात सबळ पुरावे नव्हते. तर २ प्रकरणांमध्ये पोलिसांपुढे दिलेली साक्ष, जबाब व न्यायालयापुढील उलटतपासणीत विसंगती आढळून आली.
कोट...
आम्ही तपास अधिकाऱ्यांना सिद्ध झालेले गुन्हे व निर्दोष सुटलेली प्रकरणे या दोन्हींचा अभ्यास करण्याची सवय लावली. विशेषत: निर्दोष सुटलेल्या प्रकरणात नेमकी काय त्रुटी राहिली, हे अभ्यासून आपल्या तपासाखाली असलेल्या प्रकरणात ती राहणार नाही याची काळजी घेण्यास प्रवृत्त केले. तुलनात्मक आढावा व विश्लेषणे तयार करुन त्यांचे बुकलेट सर्वांना वाटप केले. याचा परिणाम गुन्हे सिद्धीकरणाच्या वृद्धीत दिसून येत आहे.
-राज तिलक रौशन, पोलीस अधीक्षक
२०१९
२३.५५ टक्के प्रकरणांत झाली शिक्षा
२०२०
३३.६२ टक्के प्रकरणात झाली शिक्षा
२०२१
जूनखअेर ४९.६२ टक्के प्रकरणांत झाली शिक्षा