नळदुर्ग : नळदुर्ग येथे वत्सला एचपी गॅस एजन्सी समोर जिल्हा परिषद सदस्य बाबूराव मधुकरराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी स्वयंपाक करण्यासाठी गॅस सिलिंडर व फोडणी करीता गोडेतेल वापरणे परवडत नसल्याचे सांगत राष्ट्रीय कॉंग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी प्रतिकात्मक स्वरूपात दगडाची चूल पेटवून, तेलाच्या फोडणी शिवाय पाण्यात मीठ-मिरची टाकून आमटी बनवत केंद्र सरकारचा निषेध नोंदविला. ‘खायाला नाही तेल, मोदी सरकार फेल’, अशा आशयाचे फलक हातात घेऊन कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलनात काँग्रेसचे शहराध्यक्ष नवाज काझी, ज्येष्ठ कार्यकर्ते निवृत्त प्रा. जावेद काझी, नगरसेवक शहबाज काझी, विनायक अहंकारी, बसवराज धरणे, माजी नगरसेवक शब्बीरअली सय्यद सावकार, सुधीर हजारे, सचिन डुकरे, इमाम शेख, मुन्ना शरीफ शेख, अझर जहागीरदार, माजी नगराध्यक्षा मंगल सुरवसे, माजी नगरसेविका सुप्रिया पुराणिक, महिला शहराध्यक्ष कल्पना गायकवाड, समीर सुरवसे, शाहेदाबी सय्यद, तालुका महिला अध्यक्षा सुभद्राताई मुळे, कांताबाई जगताप, सुनंदा काळे आदी सहभागी झाले होते.
इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:22 IST