अणदूर : तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाच्या वतीने ‘माझा हक्क, माझे रेशनकार्ड’ ही मोहीम राबविली जात असून, याअंतर्गत ईटकळ येथे शिबिर घेण्यात आले.
यावेळी तहसीलदार सौदागर तांदळे, नायब तहसीलदार संदीप जाधव, सरपंच राजश्री बागडे, उपसरपंच फिरोज मुजावर, माजी सरपंच अरविंद पाटील, माजी सरपंच विजयकुमार गायकवाड, काशीनाथ लकडे, सायबा क्षीरसागर, अमोल पाटील, विनोद सलगरे, नजीर शेख, राहुल बागडे, पेशकार पवार, मंडळाधिकारी शिंदे, तलाठी करुणा मुळेकर, अंजुषा नाबदे, कांबळे, देशमुख, अंकुशे, मुख्याध्यापक गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ईटकळ सज्जांतर्गत गावातील लाभार्थ्यांच्या जीर्ण शिधापत्रिका बदलून देणे, विभक्त शिधापत्रिका देणे, शिधापत्रिकेतील नाव कमी करणे, नाव समाविष्ट करणे, नवीन शिधापत्रिका आदी कार्यवाही करण्यात आल्या. तहसील प्रशासनाच्या शिबिरात तुळजापूर, मंगरुळ, सावरगाव, नळदुर्ग, जळकोट, सलगरा (दि) ईटकळ सज्जातील गावांतून एकूण चार हजार अर्ज जमा झाले.