शहरं
Join us  
Trending Stories
1
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
2
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
3
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
4
Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं
5
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
6
टेन्शन वाढलं! ताप, डोकेदुखीसह भूक लागत नाही?; 'हा' धोकादायक व्हायरस करू शकतो अटॅक
7
आम्ही फटाके आणले होते... रिंकू खूप दुःखी झालाय! भारतीय खेळाडूच्या वडिलांचा भावनिक Video 
8
T20 World Cup भारत जिंकणार नाही; दिग्गजाने जाहीर केले ४ सेमी फायनलिस्ट
9
‘’उबाठा गटाची अवस्था ‘नाच गं घुमा, कशी मी नाचू’ अशी झालीय, मनसेची बोचरी टीका 
10
T20 World Cup साठीच्या भारतीय संघ निवडीची Inside Story! हार्दिक पांड्याच्या नावावर... 
11
Breaking: सलमान खानवर गोळीबार प्रकरण; आरोपींपैकी एकाची पोलिस कोठडीत आत्महत्या
12
Maneka Gandhi : "फक्त 2 दिवस बाकी..."; अमेठीतून राहुल, रायबरेलीतून प्रियंका, काय म्हणाल्या मनेका गांधी?
13
Multibagger stock: ₹६ च्या शेअरनं दिलं छप्परफाड रिटर्न; ₹१ लाखांचे बनले ₹१ कोटी, गुंतवणूकदारांची चांदी
14
भाजपने मुंबईतील तीन उमेदवार का बदलले? फडणवीस म्हणाले, 'ज्यांना बदललं त्यांनी...'
15
सिंधुदुर्गात ठाकरे गटाचं बळ वाढणार, राणेंना आव्हान देणारा जुना शिवसैनिक घरवापसी करणार 
16
Binanceच्या फाऊंडरची तुरुंगात रवानगी, सर्वात श्रीमंत Crypto नं काय केली गडबड? दहशतवादाशी निगडीत प्रकरण
17
Fact Check: नेपाळ संसदेत पंतप्रधान मोदींवर झाली नाही टीका; जाणून घ्या व्हायरल Videoचे 'सत्य'
18
नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?
19
Sanjay Singh : "कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
20
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला

सोशल मिडीयातील मित्राने बोलाविले, ती आली; त्याने अत्याचार करून सोडून दिले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2021 12:18 PM

rape on a girl in Usmanabad : सोलापूर शहरातील एका १९ वर्षीय तरुणीची उस्मानाबाद येथे राहणाऱ्या एका अनोळखी तरुणासोबत मोबाइलवरून ओळख झाली होती.

ठळक मुद्देनाव-गावाचा पत्ता नसतानाही केवळ सोशल मिडीयावर बोलण्यातून जुळले होते सूतबोलण्याला भुललेल्या तरुणीने मागचा-पुढचा विचार न करता थेट उस्मानाबाद गाठले

उस्मानाबाद : मोबाइलवरून अनोळखी लोकांसमवेत होणारी मैत्री किती विचित्र व घातक वळणावर पोहोचतेय, याची अनुभूती सोलापूरच्या एका १९ वर्षीय तरुणीस गुरुवारी आली. अशाच पद्धतीने ओळख झालेल्या मित्रास भेटण्यासाठी आलेल्या तिच्यावर त्याने अत्याचार करून सोडले. याबाबत उस्मानाबादपोलिसांत अत्याचाराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सोलापूर शहरातील एका १९ वर्षीय तरुणीची उस्मानाबाद येथे राहणाऱ्या एका अनोळखी तरुणासोबत मोबाइलवरून ओळख झाली होती. साधारणत: महिनाभरापूर्वीच अनपेक्षित झालेल्या बोलण्याने त्यांच्यातील संवाद वाढीस लागला. महिनाभरातच त्यांचे बोलणे इतके वाढले की एकमेकांचे तोंडही न पाहिलेल्या व खरे नावही माहीत नसलेल्या या दोघांचे सूत जुळून आले. मग उस्मानाबादेतील या तरुणाने तिला भेटीचा आग्रह धरला. तिलाच उस्मानाबादला भेटण्यासाठी ये, असे निमंत्रण त्याने दिले. त्याच्या बोलण्याला भुललेल्या तरुणीने मागचा-पुढचा विचार न करता ३० डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता आईला टॉप शिऊन येते, अशी थाप मारुन घर सोडले. बसने तिने थेट उस्मानाबाद गाठले. बसस्थानकावरच त्यांची पहिली भेट झाली. येथून त्या तरुणाने कारमधून शहरातीलच एका लॉजवर तिला नेले. याठिकाणी आपण पुण्याला जाऊन लग्न करू, अशी थाप देत दोन वेळा अत्याचार केला. रात्री उशिरापर्यंत ते येथे एकत्र राहिले. नंतर त्या तरुणाने कारनेच ३१ रोजीच्या पहाटे २ वाजता या तरुणीस सोलापुरात तिच्या घराजवळ आणून सोडले व पसार झाला.

पोलिसात गुन्हा दाखलहा प्रकार घरी समजल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी उस्मानाबाद गाठून येथील पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पीडितेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अज्ञात तरुणावर कलम ३७६ अन्वये अत्याचाराचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.