शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

मार्चअखेर एसटीच्या 200 बस धावणार बॅटरीवर, १७२ बसस्थानकांत चार्जिंग स्टेशन उभारणीचे काम अंतिम टप्प्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2024 13:24 IST

तांत्रिक अडचणी दूर करून मार्चअखेर पहिल्या टप्प्यात २०० इलेक्ट्रिक बस एसटीच्या ताफ्यात धावणार आहेत. त्यामुळे  लवकरच सर्वसामान्य जनतेचे प्रदूषणमुक्त वातानुकूलित प्रवासाचे स्वप्न  सत्यात उतरणार आहे.

धाराशिव :  राज्यातील १७२ बसस्थानकांत इलेक्ट्रिक बससाठी चार्जिंग स्टेशन निर्माण केली जाणार आहेत. या कामाचे कार्यारंभ आदेश निघाले असून, युद्धपातळीवर चार्जिंग स्टेशन उभारली जात आहेत. तांत्रिक अडचणी दूर करून मार्चअखेर पहिल्या टप्प्यात २०० इलेक्ट्रिक बस एसटीच्या ताफ्यात धावणार आहेत. त्यामुळे  लवकरच सर्वसामान्य जनतेचे प्रदूषणमुक्त वातानुकूलित प्रवासाचे स्वप्न  सत्यात उतरणार आहे.

प्रदूषण रोखणार, बचत होईलnवातावरणातील प्रदूषण रोखण्यासाठी तसेच इंधनावरचा खर्च कमी करण्यासाठी महामंडळाने इलेक्ट्रिक बसेस आपल्या ताफ्यात आणण्याचा निर्णय घेतला आहे. nत्यानुसार राज्यात एकूण ५ हजार १५० बस धावणार आहेत. पहिल्या टप्प्यात २०० बस मार्चअखेरपर्यंत विविध जिल्ह्यांतून धावायला सुरुवात होईल. यासाठी १७२ बसस्थानकांमध्ये चार्जिंग स्टेशनच्या कामाचे कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. nचार्जिंग स्टेशनसाठी एसटी महामंडळाला स्पेशल सप्लाय घ्यावा लागणार आहे. यासाठी महावितरणकडे प्रतिसप्लाय २५ लाख रुपयांची सुरक्षा अनामत ठेवावी लागणार आहे.

२०० इलेक्ट्रिक बसराज्यातील १७२ चार्जिंग स्टेशनच्या कामाला वर्कऑर्डर देण्यात आली आहे. मार्चअखेरपर्यंत ५ हजार १५० पैकी पहिल्या टप्प्यात २०० इलेक्ट्रिक बस सुरू करण्यात येणार आहेत. याबाबत संबंधितांना सूचना दिल्या आहेत.- अभिजित भोसले, जनसंपर्क अधिकारी, राज्य परिवहन महामंडळ

बसच्या चार्जिंगसाठी लागणार तीन तास...एक  बस पूर्ण चार्ज होण्यासाठी किमान तीन तासांचा अवधी लागेल. कमी दाबाने वीजपुरवठा हाेत असल्यास हा कालावधी आणखी वाढू शकताे. अशा ठिकाणी महावितरणकडून स्वतंत्र ट्रान्स्फाॅर्मर दिला जाणार आहे. इलेक्ट्रिक बस एकदा चार्जिंग केल्यास किमान तीनशे किलाेमीटर धावेल. डिझेलच्या तुलनेत विजेवर हाेणारा खर्च कमी असेल. एवढेच नाही तर सर्व्हिसिंगचा खर्चही बऱ्यापैकी कमी असेल.  

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर