जिल्ह्यातील भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांच्या मंगळवारी आयोजित बैठकीत ते बोलत होते.
यावेळी मराठवाडा संघटनमंत्री भाऊराव देशमुख, भाजयुमो प्रदेश सरचिटणीस राहूल लोणीकर, भाजप जिल्हाध्यक्ष नितिन काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्ह्यात विधानसभानिहाय युवा मोर्चाचे किमान पाच पदाधिकारी असे असावेत की ज्यांनी दिवसातील किमान दोन तासाचा वेळ पक्षकार्याला द्यावा, असे सांगून बावनकुळे म्हणाले की, अशा निवडक कार्यकर्त्यांनी प्रत्येक मंडळात दोन हजार विशेष सक्रिय कार्यकर्त्यांची फळी उभारावी. समाज माध्यमांसह सर्व मोर्चाचे पदाधिकारी, आघाड्यांचे पदाधिकारी यांच्याशी संपर्क ठेवावा, अशा सूचनाही त्यांनी केल्या. यावेळी राहुल लोणीकर यांनीही मार्गदर्शन केले. जिल्ह्यातील युवा मोर्चाच्या कामाचा आढावा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर यांनी सादर केला.
बैठकीस माजी जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, ॲड. मिलिंद पाटील, जि. प. चे माजी अध्यक्ष नेताजी पाटील, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुधीर पाटील, ॲड. अनिल काळे, ॲड. खंडेराव चौरे, संताजीराव चालुक्य-पाटील, सरचिटणीस ॲड. नितीन भोसले, इंद्रजित देवकते, उपनगराध्यक्ष अभय इंगळे, ललिता जाधव, गजानन नलावडे, बालाजी चव्हाण, विनोद निंबाळकर, गणेश इंगळगी, गिरीश पानसरे, सुजित साळुंके, सूरज शेरकर, बंटी मुंडे, विशाल पाटील, संदीप इंगळे, पंकज जाधव, राज निकम, राम चोपदार, आशिष मोरे, ॲड. कुलदीपसिंह भोसले, अमोल राजेनिंबाळकर, स्वप्निल नाईकवाडी, प्रसाद मुंडे, अक्षय व्यास, शरीफ शेख, नानासाहेब डोंगरे आदी उपस्थित होते.