शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

चारित्र्याच्या संशयावरून बहिणीस मारहाण, मेहुण्याने भाऊजीला चारचाकी अंगावर घालून चिरडले

By बाबुराव चव्हाण | Updated: January 18, 2024 19:32 IST

याप्रकरणी चाैघांविरुद्ध तुळजापूर पाेलिस ठाण्यात गुरुवारी गुन्हा नाेंद झाला आहे.

तुळजापूर (जि. धाराशिव) : चारित्र्यावर संशय घेऊन बहिणीला नेहमी मारहाण केली जात असल्याचा राग मनात धरून मेहुण्याने मित्रांच्या मदतीने अंगावर चारचाकी वाहन घालून आपल्या भाऊजीचा (बहिणीचा पती) खून केला. ही धक्कादायक घटना तुळजापूर तालुक्यातील अक्कलकाेट महामार्गावरील कसई पाटी येथे बुधवारी रात्री सात वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी चाैघांविरुद्ध तुळजापूर पाेलिस ठाण्यात गुरुवारी गुन्हा नाेंद झाला आहे.

तुळजापूर तालुक्यातील इटकळ येथील बसवेश्वर भीमाशंकर जळकोटे (मयत) हे सोलापूर येथील कांदा मार्केटमध्ये हमालीचे काम करीत होते. तर, त्यांची पत्नी अश्विनी जळकोटे या मंगरूळ येथील कंचेश्वर साखर कारखाना परिसरातील खासगी कॅन्टीनमध्ये मजुरीचे कामासाठी हाेत्या. चारित्र्याच्या संशयावरून या दाेघांमध्ये नेहमी कडाक्याचे भांडण हाेत असे. यातूनच अश्विनी यांना बेदम मारहाणही केली जात हाेती. 

हाच राग मनात धरून मेहुणा सागर सुभाष धबडे (रा. कास्ती, जि. साेलापूर) याने आपल्या तिघा मित्रांच्या मदतीने भाऊजी बसवेश्वर जळकाेटे यांना अक्कलकाेट महामार्गावरील कसई पाटी येथे बेदम मारहाण केली. मारहाणीत बसवेश्वर जळकाेटे अक्षरश: रक्ताने माखले हाेते. अशा गंभीर जखमी अवस्थेत ते रस्त्याच्या कडेला उभे असतानाच सागरने आपल्या ताब्यातील  चारचाकी वाहन त्यांच्या अंगावर घातले असता ते रक्ताच्या थाराेळ्यात पडले. 

उपस्थितांनी गंभीर जखमी अवस्थेत बसवेश्वर यांना खाजगी वाहनातून मंगरूळ येथील आराेग्य केंद्रात दाखल केले. परंतु, प्रचंड रक्तस्राव सुरू असल्याने तेथील डाॅक्टरांनी वाहनातच तपासणी करून तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात रेफर केले. ताेवर उशीर झाला हाेता. उपस्थित डाॅक्टरांनी तपासणी करून बसवेश्वर यांना मयत घाेषित केले. यानंतर पाेलिसांनी संबंधित घटनेचा पंचनामा करून शव नातेवाइकांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी मयताची बहीण वनिता सिद्धेश्वर ममाने (रा. कसई) यांनी गुरुवारी तुळजापूर पाेलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मयताची पत्नी, मेहुणा व अन्य तिघे अशा चाैघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

घटनेपूर्वी नेमकं काय घडलं हाेतं?बुधवारी सायंकाळी ६ वाजता मयताची पत्नी अश्विनी, मुलगा आणि मुलगी असे तिघे फिर्यादी वनिता ममाने यांच्या घरी गेले हाेते. भाऊ घेण्यासाठी आल्याने अश्विनी आपल्या मुलांसह कसई पाटीवर गेल्या हाेत्या.  यावेळी त्यांच्यासाेबत वनिता आणि त्यांचा मुलगा ओंकारही हाेता. पिकअपमधून उतरून अश्विनी मुलांसह भाऊ थांबलेल्या कारकडे जात असतानाच आतमध्ये सागर धबडे (अश्विनी यांचा भाऊ), इतर तिघे आणि बसवेश्वर हेही हाेते. पत्नीला पाहून ‘अशू, तुझ्या भावाने खूप मारले गं’ असं म्हणत बसवेश्वर  माेठ्यानं ओरडले. रक्ताने माखलेल्या अवस्थेत ते गाडीतून उतरून रस्त्याच्या कडेला थांबले असता, सागर याने त्यांच्या अंगावर गाडी घातली. यात ते गंभीर जखमी झाले. रुग्णालयात पाेहाेचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्याेत मालवली, असे वनिता ममाने यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीOsmanabadउस्मानाबाद