ढोकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित या रक्तदान महायज्ञाचे उद्घाटन सकाळी १० वाजता आ. कैलास पाटील, डॉ. जयप्रकाश राजे निंबाळकर, भारतीय जैन संघटनेच्या राज्य उपाध्यक्ष कांचनमाला उत्कर्ष संगवे, ढोकी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुरेश बनसोडे, उपसरपंच अमोल समुद्रे, कसबे तडवळाचे माजी उपसरपंच तुळशीदास जमाले यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
या शिबिरात जास्तीत जास्त दात्यांनी सहभाग नोंदवून रक्तदान करावे, असे आवाहन ‘लोकमत’सह पंचायत समिती सदस्य संग्राम देशमुख, भारत देशमुख, समद शेख, माणिक वाकुरे, गुणवंत देशमुख, समाज कल्याण विभागाचे माजी सभापती दगडू धावारे, शाकीर शेख, पवन कोळी, समीर पठाण, पंकज देशपांडे, गोवर्धनवाडीच्या सरपंच निलावती लोमटे, उपसरपंच विनोद थोडसरे, वाखरवाडीचे माजी सरपंच नानासाहेब शिंदे, बालाजी सुरवसे, सरपंच उज्ज्वला बंडू धावारे, उपसरपंच स्नेहा पवार, ग्रा.पं. सदस्य धनंजय शिंदे, सुनील लोमटे, प्रभाकर शेंडगे, संजय भुतेकर, पांडुरंग शेंडगे, अण्णासाहेब देटे, गणेश देटे, आदर्श घोडके, उमेश शिंदे, दीपक शिंदे, समाधान शिंदे व शिवसेना, युवासेना पक्षाच्यावतीने करण्यात येत आहे.