शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी: तुळजापुरातील ड्रग्जचे धागेदोरे मंदिरापर्यंत?; काही पुजारी सेवनात गुंतले असल्याची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 11:56 IST

नोटीस दिलेल्यांमध्ये सुमारे १२ ते १३ जण मंदिरातील पुजारी असल्याची चर्चा तुळजापुरात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, धाराशिव : तुळजापूर येथील ड्रग्स प्रकरणाचे धागेदोरे मंदिरापर्यंत पोहोचल्याचा दावा केला जात आहे. जवळपास १२ ते १३ पुजारी सेवनात गुंतले असून, त्यांना चौकशीसाठी नोटिसा देण्यात आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. मात्र, पुजारी मंडळांनी संतप्त भावना व्यक्त करीत हा समस्त पुजाऱ्यांच्या बदनामीचा प्रकार असल्याची भूमिका मांडली आहे. यावरून आता तुळजापूर वादविवादाचा आखाडा बनला आहे.

तुळजापूर, तामलवाडी येथील ड्रग्स प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी ३५ आरोपी निश्चित केले आहेत. यापैकी १४ आरोपी कोठडीत आहेत, तर २१ आरोपी फरार आहेत. या फरारींमध्ये माजी नगराध्यक्ष, नगरसेवकाचाही समावेश आहे. एकीकडे या फरारींचा शोध घेत असतानाच पोलिसांनी आरोपींशी सातत्याने असलेला संपर्क, आर्थिक व्यवहार केलेल्या अनेकांना संशयावरून चौकशीच्या नोटिसा दिल्या आहेत. 

१२ ते १३ पुजाऱ्यांना नोटीसनोटीस दिलेल्यांमध्ये सुमारे १२ ते १३ जण मंदिरातील पुजारी असल्याची चर्चा तुळजापुरात आहे. या चर्चा सुरू होताच मंदिरातील पुजारी मंडळांनी एकत्र येत, हा पुजाऱ्यांच्या बदनामीचा कुटिल डाव असल्याचा आरोप केला आहे.   

जिल्हाधिकारी म्हणाले...जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष कीर्ती किरण पुजार म्हणाले की,  मंदिरातील कोणी यात सहभागी असेल व दोषी सिद्ध झाले तर विश्वस्त बैठकीत हा विषय मांडून कार्यवाहीचा विचार केला जाईल. दोष सिद्ध होण्यापूर्वी कार्यवाहीची घाई केली जाणार नाही.

पुजारी काय म्हणतात?ड्रग्स प्रकरण उघडकीस आणण्यासाठी पुजारी मंडळांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. यामध्ये दोषी असलेल्या प्रत्येकावर कायद्याने कारवाई जरूर करावी. मात्र, त्याआडून समस्त पुजाऱ्यांच्या बदनामीचा कुटिल डाव खेळू नये, अशी प्रतिक्रिया पाळीकर पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपीन शिंदे, भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे परमेश्वर कदम, प्रक्षाळ पुजारी मंडळाचे अध्यक्ष विशाल रोचकरी यांनी माध्यमांकडे व्यक्त केली.

पोलिसांचे म्हणणे काय?या प्रकरणाचा तपास सुरुवातीपासूनच आरोपी कोण आहेत, कोणाशी संबंधित आहेत, हे न पाहता पारदर्शकपणे करीत आहोत.  ज्यांच्याविषयी सबळ पुरावे आढळले आहेत, त्यांच्यावर कारवाई करीत आहोत. मग ते पुजारी आहेत, नागरिक आहेत की अन्य कोणी, यावर आमचा फोकस नसल्याचे पोलिस अधीक्षक संजय जाधव यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDrugsअमली पदार्थdharashivधाराशिव