शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

ऑक्सिजन निर्मितीत भैरवनाथ कारखान्याचीही उडी; २४० सिलेंडर्स क्षमतेचा प्लांट कार्यान्वित होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 14:44 IST

corona virus : तामलवाडीचा प्लांट वगळता उस्मानाबादला ऑक्सिजनसाठी अन्य जिल्हे व राज्यांवर अवलंबून रहावे लागत आहे.

ठळक मुद्देसवा कोटी रुपयांची गंतवणूक करून महिनाभरात प्लांट सुरु होणारजिल्ह्यात ऑक्सिजन बेडची संख्याच मर्यादित असल्याने वेळ निभावून जात आहे.इतर जिल्ह्यातून पुरवठा थांबल्यास उस्मानाबादची अडचण होईल

उस्मानाबाद : जिल्ह्यात ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे निर्माण झालेले पेचप्रसंग व रुग्णांच्या उपचारावर झालेला विपरीत परिणाम लक्षात घेऊन साखर कारखान्यांनी ऑक्सिजन निर्मितीच्या क्षेत्रात पाऊल टाकले आहे. आता सोनारी येथील भैरवनाथ साखर कारखान्यानेही सवा कोटी रुपयांची गुंतवणूक करीत पुढील महिन्यापर्यंत प्लांट कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने व त्यातही ऑक्सिजनची गरज असलेल्या गंभीर रुग्णांची संख्या लक्षात घेता जिल्ह्यात ऑक्सिजनच्या तुटवड्याची चिन्हे निर्माण झाली होती. मात्र, ऑक्सिजन बेडची संख्याच मर्यादित असल्याने वेळ निभावून जात आहे. दरम्यान, प्रशासनाने तिसर्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन संपूर्ण जिल्हाभरात ऑक्सिजन बेडची संख्या वाढविण्यावर भर दिला आहे. यामुळे भविष्यात मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठाही आताच्या तुलनेत जास्तीचा लागणार आहे. तामलवाडीचा प्लांट वगळता उस्मानाबादला ऑक्सिजनसाठी अन्य जिल्हे व राज्यांवर अवलंबून रहावे लागत आहे. या इतर जिल्ह्यातून पुरवठा थांबल्यास उस्मानाबादची अडचण होईल. मात्र, या अडचणी भविष्यात उद्भवू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या हाकेस साखर कारखाने धावून येत आहेत. पहिल्यांदा धाराशिव कारखान्याने प्रकल्प उभारला. लवकरच येथून ऑक्सिजन मिळेल. यापाठोपाठ रांजणीच्या नॅचरल शुगर, पाडोळी येथील रुपामाता उद्योग समुहाने पुढाकार घेतला. आता सोनारी येथील भैरवनाथ साखर कारखान्यानेही पुढाकार घेऊन आ.तानाजी सावंत यांच्या सूचनेनुसार ऑक्सिजन प्लांटच्या उभारणीचे काम हाती घेतले आहे.

२४० सिलेंडर्सची क्षमता...भैरवनाथ कारखान्याने सव्वा कोटी रुपयांची गुंतवणूक या प्रकल्पात केली आहे. नाशिक येथील कंपनीस प्लांटच्या उभारणीचे काम सोपविले असून, येथून दररोज २४० सिलेंडर्स ऑक्सिजनची निर्मिती होऊ शकेल. जून महिन्यात प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे.

टॅग्स :Oxygen Cylinderऑक्सिजनcorona virusकोरोना वायरस बातम्याOsmanabadउस्मानाबाद