शहरं
Join us  
Trending Stories
1
"रवींद्र वायकर यांचा विजय खरा नाही, विजयी करणारा फोन पोलीस स्टेशनमधून बदलण्याचा प्रयत्न"
2
ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी; शिवसेना शिंदे गट - ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन
3
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
4
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
5
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन
6
गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत
7
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
8
Market Cap: मुकेश अंबानींच्या रिलायन्सची हवा, LICची ही झाली मोठी कमाई; TCS सह 'या' कंपन्यांना नुकसान
9
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
10
Success Story : एकेकाळी ₹२५० साठी करायचे काम, १२वी मध्ये दोनदा अपयश; आता उभी केली ₹१ लाख कोटींची कंपनी
11
'अभिनेत्री' आलिया भट झाली 'लेखिका', स्वतःच्या पहिल्या पुस्तकाचं केलं प्रकाशन! काय आहे विषय?
12
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
13
आइस्क्रीममध्ये मानवी बोट; उत्पादन करणाऱ्या डेअरीला अखेर FDAचा दणका
14
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
15
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
16
निवृत्तीचे वय ६० करण्यास राज्य सरकार सकारात्मक
17
नीटची संस्था ‘नीट’ करणार; घोळ करणाऱ्यांना सोडणार नाही: सरकार उचलणार कठाेर पाऊल
18
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
19
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
20
वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण

सावधान कोरोना परतोय; उस्मानाबाद जिल्ह्यातील ३३ गावे धोक्याच्या उंबरठ्यावर, ऍक्टिव्ह रुग्णसंख्या हजारावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2021 10:26 AM

Corona Virus in usmanabad : जिल्ह्यातील ३३ गावांत सध्या पाचहून अधिक ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

ठळक मुद्देसुरक्षित अंतर, मास्कचा वापर याकडे दुर्लक्ष झाले आहे. आता सवलतीमध्ये आणखी मुभा मिळाली आहे.

उस्मानाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची धूळ खाली बसतोय न बसतोय तोच आता तिसऱ्या लाटेची घंटा वाजलीय. जिल्ह्यातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या हजारावर पोहोचलीय. शिवाय,जिल्ह्यातील ३३ गावे धोक्याच्या उंबरठ्यावर आहेत. (33 villages in Osmanabad district on the verge of danger, active number of corona patients in thousands ) कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने जिल्ह्यात निर्माण केलेला उद्रेक सर्वांनी जवळून अनुभवला आहेच. तरीही काळजी घेण्याची तसदी कोणी घेत नसल्याचे दिसून येत आहे. सुरक्षित अंतर, मास्कचा वापर याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यातच आता सवलतीमध्ये आणखी मुभा मिळाली आहे. याचा परिणाम म्हणून दररोज रुग्णसंख्या शंभरीच्या आसपास फिरतेय. आजघडीला जिल्ह्यातील ३३ गावात ५ पेक्षा जास्त रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. त्यामुळे चिंतेत भर पडली आहे.

कुंभेजा, खासापुरीत उद्रेक... सध्या परंडा तालुका डेंजर झोनमध्ये दिसतो आहे. या तालुक्यातील ८ गावांत पाचहून अधिक रुग्ण आहेत. येथील कुंभेजा गावात ३१ तर खासापुरीत ३० रुग्ण आहेत. याशिवाय, उस्मानाबाद तालुक्यातील ८, वाशी ७, भूम ३, कळंब, लोहारा, तुळजापूर तालुक्यात प्रत्येकी २ तर उमरगा तालुक्यातील एका गावात पाचहून अधिक रुग्ण आहेत. 

- तर या गावात कंटेन्मेंट झोन : जिल्हाधिकारी जिल्ह्यातील ३३ गावांत सध्या पाचहून अधिक ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. या गावात टेस्ट वाढविण्याच्या सूचना आरोग्य यंत्रणेला दिल्या आहेत. यानंतरही संबंधित गावातील रुग्णसंख्या कमी होताना दिसली नाही तर येत्या २-३ दिवसात तेथे कंटेन्मेंट झोन लागू करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOsmanabadउस्मानाबाद