शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बळीराजाची व्यथा... सततच्या लॉकडाऊनमुळे 5 एकरवरील टरबूज बनलं जनावरांचा घास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2021 16:34 IST

मराठवाड्यात आजही पारंपरिक पिकावर शेतकऱ्यांचा भर राहिला आहे. मात्र, बदलत्या काळाच्या ओघात काही शेतकऱ्यांनी पीकपद्धतीत बदल केले. त्यातही उत्पादन वाढीपेक्षा नुकसानीचाच त्यांना सामना करावा लागत आहे.

ठळक मुद्देमराठवाड्यात आजही पारंपरिक पिकावर शेतकऱ्यांचा भर राहिला आहे. मात्र, बदलत्या काळाच्या ओघात काही शेतकऱ्यांनी पीकपद्धतीत बदल केले. त्यातही उत्पादन वाढीपेक्षा नुकसानीचाच त्यांना सामना करावा लागत आहे.

मुंबई/उस्मानाबाद - कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचा शेतकऱ्यांनाही चांगलाच फटका बसला आहे. शेतकऱ्यांना माल विकण्यास परवानगी देण्यात आली असली, तरी लॉकडाऊनमुळे ग्राहक मिळत नाही, मिळालं तरी कमी किंमतीत माल विकावा लागत आहे. उस्मानाबाद जिल्ह्याच्या देवळाली येथील एका शेतकऱ्याने चक्क 5 एकर कलिंगड जनावराच्या दावणीला बांधलं आहे. लॉकडाऊनमुळे बाजारात किंमत नसल्यानं ही वेळ आल्याचं शेतकरी  यांनी म्हटलंय.   

मराठवाड्यात आजही पारंपरिक पिकावर शेतकऱ्यांचा भर राहिला आहे. मात्र, बदलत्या काळाच्या ओघात काही शेतकऱ्यांनी पीकपद्धतीत बदल केले. त्यातही उत्पादन वाढीपेक्षा नुकसानीचाच त्यांना सामना करावा लागत आहे. नैसर्गिक संकटासोबत आता कोरोनाच्या महासंकटामुळे बागायतदार शेतकऱ्यांनाही समस्यांचा सामना करावा लागत आहे. भाऊसाहेब गायकवाड यांना देवळाली शिवारात 21 एकर क्षेत्र आहे. उत्पादन वाढीच्या दृष्टीने त्यांनी गतवर्षी 3 एकरात दोडक्याची लागवड केली. मात्र, लॉकडाऊनमुळे दोडके हे वेलालाच वाळून गेले. गतवर्षी झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी यंदा फेब्रुवारी महिन्यात भाऊसाहेब आणि त्यांचे बंधू नानासाहेब गायकवाड यांनी तब्बल 5 एकरात टरबूज पिकाची लागवड केली, पण यंदाही पुन्हा एप्रिल, मे आणि जून महिन्यातील लॉकडाऊनमुळे त्यांचे अतोनात नुकसान झाले.  

3 लाखांच्या उत्पादनावर लॉकडाऊनने पाणी फेरले

फवारणी, मशागत आणि औषधसाठी गेल्या चार महिन्यात 50 हजार रुपये खर्च करण्यात आले. अविरत परिश्रमाच्या जोरावर एक नग 6 ते 7 किलोचा झाला होता. किमान 3 रुपये किलोप्रमाणे दर मिळाला तरी 3 लाखाचे उत्पादन होईल, असा आशावाद होता. मात्र, काढणीच्या प्रसंगी असलेल्या लॉकडाऊनमुळे त्यांच्या फडावर व्यापारीच फिरकले नाहीत. शिवाय सर्व बाजारपेठा बंद असल्याने विक्री कुठे करावी? हा प्रश्न निर्माण झाल्याने त्यांच्या स्वप्नांवर पाणीच फेरले. 

काढणी खर्च टाळण्यासाठी फुकटात टरबूज

भाऊसाहेबांच्या शेतात डेरेदार टरबूज पडून आहेत. आता खरीपासाठी क्षेत्र रिकामे करण्याच्या दृष्टीने वावरात पडलेली टरबूज जनावरांच्या दावणीवर जात आहेत. भरघोस उत्पादनाऐवजी आता शेतातील टरबूज बाहेर काढण्यासाठी गायकवाड यांना 15 हजाराचा खर्च आहे. कोरोनामुळे मृत्यूच्या संख्येत वाढ होत आहे, त्यामुळे या नुकसानीकडे लक्ष तरी कोण देणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे फुकट टरबूज घेऊन जाण्याचं आवाहन त्यांनी गावकऱ्यांना केलं.  

गावातील वाढत्या कोरोनामुळे कुणीच फिरकेना 

गावात वाढती कोरोना रुग्णांची संख्या आणि निर्माण झालेले वातावरण यामुळे फुकटही कोणी घेऊन जाण्यास धजत नाही. खर्च टाळण्यासाठी अख्ख कुटुंब राबतंय. उत्पादन नाही किमान काढणीला अधिकचा खर्च होऊ नये, म्हणून गायकवाड कुटुंबातील सर्व सदस्य हे टरबूजाच्या फडात राबले. टरबूजाची जोपासना करण्यात जे हात राबत होते. त्याच हातांनी हे टरबूज जनावरांच्या दावणीवर टाकण्याची नामुष्की या शेतकरी कुटुंबीयांवर आली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याFarmerशेतकरीOsmanabadउस्मानाबाद