उभ्या वाहनांमुळे अपघाताचा धोका तेर : कारखान्यांचे गाळप सुरु झाल्यामुळे सध्या शेतशिवारातील ऊस तोडणी करून तो कारखान्याकडे पाठविण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. यामुळे सर्वच रस्त्यांवर ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची वर्दळ वाढली आहे. परंतु, अनेक ठिकाणी कुठल्या ना कुठल्या कारणावरून ऊस वाहतुकीची ही वाहने चालक रस्त्यात उभी करीत असून, यामुळे अपघातचा धोका वाढला आहे. त्यामुळे अशा धोकादायकरित्या उभ्या राहणाऱ्या वाहनांवर कारवाईची मागणी
नागरिकांमधून होऊ लागली आहे.