उमरगा : नेहरू युवा केंद्र व एकुरगावाडी येथील श्री छत्रपती शिवाजी बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कॅच द रेन’ कार्यक्रमांतर्गत ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ या विषयावर तालुक्यातील कलदेव निंबाळा, आलूर, समुद्राळ, कडदोरा, व्हंताळ, एकुरगा, जवळगा बेट, एकुरगावाडी आदी गावांमध्ये रॅली काढून जनजागृती करण्यात आली, तसेच विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा आणि महिलांची भाषण स्पर्धा घेण्यात आली. पाण्याचे महत्त्व, विहीर पुनर्भरण, बोअर पुनर्भरण, हातपंप स्वच्छता, सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता, असे उपक्रम १२ गावांमध्ये राबविण्यात आले.
यासाठी संस्थेचे अध्यक्ष किशोर औरादे, पल्लवी डोणगावे, सुवर्णा कोटे, सरोजा औरादे, मालाश्री बगले, ज्योती बोळदे, अलका गुरव, सुवर्णा जाधव, सिंधू नागदे, वैशाली चव्हाण, जयश्री सगर, संगीता करके, महादेवी करके, प्रतिभा शिंदे, अश्विनी इंगळे, मुस्कान शेख, रुक्मिणी शिंदे आदींनी परिश्रम घेतले.