शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 19:08 IST

शासनाकडून मिळालेल्या सिलिंग शेतजमिनीवर केलेली बेकायदेशिररित्या नोंद रद्द करावी, शेतजमीन परत मिळावी अशा मागण्या आहेत

ठळक मुद्देशेतजमिनीच्या वादाचे प्रकरण पाच जण पोलिसांच्या ताब्यात

उस्मानाबाद : शासनाकडून मिळालेल्या सिलिंग शेतजमिनीवर केलेली बेकायदेशिररित्या नोंद रद्द करावी, शेतजमीन परत मिळावी, या मागणीसाठी मंगरूळ येथील शेतकऱ्यांसह महिलांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला़ पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून पाच जणांना ताब्यात घेतले़

तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथील सुधाकर शंकर पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना यापूर्वी विविध मागण्यांचे निवेदन दिले होते़  पवार यांच्यासह सहा जणांना कसई शिवारात शासनाकडूेन १६ एकर ४ गुंठे जमीन सिलिंग वाटप झाली आहे़ तुळजापूर येथील तहसीलदारांनी जमिनीवर जाऊन जमिनीचा कब्जा दिला आहे़ मात्र, दोघांनी संगणमत करून सहा जणांच्या नावावर असलेली सातबारा नोंद रद्द करून ती जमीन स्वत:च्या नावावर बेकायदेशिरित्या केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला होता.

ही नोंदणी रद्द करून जमीन परत मिळावी, अशी मागणी करण्यात आली होती़ मात्र, मागणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने सुधाकर पवार यांच्यासह इतर दोन शेतकरी, दोन महिला अशा पाच जणांनी मंगळवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले़ मागण्या मान्य होत नसल्याने हातात डिझेलची बाटली घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला़ यावेळी उपस्थित पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले़ त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलकांसमवेत चर्चा करून चौकशीचे आश्वासन दिले़ दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या पाच जणांवर आनंदनगर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली़

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादUsmanabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबादFarmerशेतकरी