सरपंचपदी लक्ष्मण बनसोडे, उपसरपंचपदी सावंत यांची वर्णी
तेर -तालुक्यातील जागजी ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला. सरपंचपदी लक्ष्मण बनसाेडे तर उपसरपंचपदी वैजिनाथ सावंत यांची वर्णी लागली. निवडीनंतर पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जलाेष केला.
जागजी ग्रामपंचायत निवडणुकीत खा. ओमराजें निंबाळकर यांच्या मामाश्रीच्या पॅनलने १३ पैकी ८ जागा जिंकून सत्ता काबीज केली. यानंतर सरपंच, उपसरपंच निवडीसाठी विशेष सभा बोलावण्यात आली असता दाेन्ही पदांसाठी मतदान घेण्यात आले. शिवसेनाप्रणीत पॅनलप्रमुख नानासाहेब पाटील यांच्याकडे स्पष्ट बहुमत असतानाही या निवडीत विरोधी पॅनल प्रमुखांनी आपले उमेदवार उभे करून निवडीत रंगत आणली. शेवटी १३ पैकी ८ सदस्यांनी शिवसेनाप्रणीत पॅनला मतदान केल्याने लक्ष्मण बनसोडे यांची सरपंचपदी तर उपसरपंचपदी वैजिनाथ सावंत यांची वर्णी लागली. निवडीनंतर नव्या कारभाऱ्यांनी गावातून जंगी मिरवणूक काढली.