शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेसाठी कुछ भी ! सकाळी सडकून टीका, सायंकाळी गोंजारले; नासुरांचेही जुळले सूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 18:00 IST

एकमेकांच्या विरोधात भांडी आपटणारे पक्ष आले एकत्र

धाराशिव : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत धाराशिवला अकल्पित अशा युती-आघाड्या तयार झाल्या आहेत. एरवी एकमेकांच्या विरोधात अद्वातद्वा बेसुरात भांडणारे पक्ष, नासूर संबोधणारे पक्ष आता ‘विकासा’चा कोरस गाऊ लागल्याने मतदारही अचंबित झाले आहेत. धाराशिव जिल्ह्यातील आठ नगरपरिषदांसाठी निवडणुकीची प्रकिया सुरू आहे. महायुती व आघाडीसाठी वरवरचे प्रयत्न करून झाल्यानंतर राजकीय महत्त्वाकांक्षेसाठी स्थानिक नेते, पदाधिकाऱ्यांनी वेगळ्या चुली मांडल्या आहेत. त्यास पक्षश्रेष्ठींचीही उघड संमती मिळाली आहे.

राजकारणात काहीही अशक्य नसते, आजचा शत्रू उद्या मित्र बनू शकतो, हे वास्तव उमरगा, मुरूम, भूम, परंडा या नगरपरिषदांमध्ये झालेल्या आघाड्यांनी रणधुमाळीत उतरवले आहे. भूम व परंडा पालिकेत शिंदेसेनेचे आ. तानाजी सावंत यांनी विरोधकांच्या हालचाली टिपत स्वतंत्र चूल मांडली. त्यांचे समर्थक येथून एकटे लढत आहेत. तर त्यांच्याविरोधात उध्दवसेनेचे कार्यकर्ते नगराध्यक्षपदासाठी उभे आहेत. त्यांना भाजपसह काँग्रेस, राष्ट्रवादीचे बळ मिळाले आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणी मशालीचे उपरणे खाली ठेवून पॅनल तयार करण्यात आले आहे. उमरग्यात आजवर एकमेकांचे कट्टर वैरी असलेल्या शिंदेसेना व काँग्रेसची ‘हात’मिळवणी झाली आहे. मुरूम पालिकेतही भाजपच्या विरोधात एरवी वैरभाव जपणारे इतर राजकीय पक्ष एकत्र आल्याचे पाहायला मिळत आहे.

शहरागणिक बदलले नेत्यांचे सूर...उमरग्यात शिंदेसेना व काँग्रेसची युती भाजपविरोधात लढत आहे. तर कळंबमध्ये भाजप-शिंदेसेना एकत्र आहे. यामुळे नेत्यांसमोर विचित्र पेच आहे. उमरग्यात पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी सायंकाळी भाजप नेत्यांवर सडकून टीका केली. यानंतर अवघ्या दोन तासांनी धाराशिवमध्ये झालेल्या सभेत मित्र म्हणून गोंजारले. कळंबलाही अशीच स्थिती आहे. भाजपच्या नेत्यांचीही या ठिकाणी अशीच पंचाईत झाली आहे.

महंतांची माघार कोणाच्या पथ्यावर?तुळजापूर पालिकेची निवडणूकही सध्या गाजते आहे. ड्रग्स प्रकरणातील आरोपांची राळ उडवून आघाडी शर्यतीत आली आहे. दुसरीकडे मोठा मानमरातब असलेल्या महंत इच्छागिरी महाराजांनी उमेदवारी कायम असतानाही निवडणुकीतून माघार घेतल्याने मोठा ट्विस्ट निर्माण झाला. त्यांची माघार कोणाच्या पथ्यावर पडेल, याची समीकरणे जुळवण्यात राजकारणी व्यस्त आहेत.

व्हायरल डान्स अन् रीलवार...धाराशिवच्या शहराच्या बकाल अवस्थेवर दोन्ही बाजूंनी ही स्थिती प्रतिस्पर्ध्यांनीच आणली, असे सांगणारे रील्स युद्ध उद्धवसेना व भाजपमध्ये सुरू आहे. सोबतच गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन्हीकडील पदाधिकाऱ्यांचे डान्स कसे उन्मादी होते, हे सांगण्याचीही शर्यत लागली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : For Power, Anything Goes! Political Alliances Shift in Dharashiv Elections.

Web Summary : Dharashiv local elections see unexpected alliances as rivals unite for 'development'. Leaders form separate paths for political gain, with party approval. Enemies become allies in Umarga, Murum, Bhum, and Paranda. Shifting alliances create unusual situations for leaders.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूकdharashivधाराशिव