शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

बंद कार सुरू करण्याच्या प्रयत्नात भडका उडाला; कारच्या मालकाचा हाेरपळून मृत्यू, दोघे बचावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 19:45 IST

कारने पेट घेतल्यानंतर मालकाला दरवाजा उघडून बाहेर पडता आले नाही; दोघे मित्र बालंबाल बचावले

- समीर सुतकेउमरगा (जि. धाराशिव) : शिर्डी येथून साई दर्शन आटाेपून तिघे मित्र कारमधून आपल्या गावी हैदराबादकडे परतत हाेते. रविवारी पहाटे उमरगा तालुक्यातील दाबका गावानजीक त्यांची कार बंद पडली. यानंतर कार सुरू करण्याच्या प्रयत्नात असतानाच अचानक भडका उडाला. या घटनेत कार मालकाचा हाेरपळून मृत्यू झाला, तर दाेघे जण बालंबाल बचावले. 

तेलंगणा राज्यातील नलगोंडा येथे कार्यरत तर हैदराबाद येथे वास्तव्यास असणारे सरकारी शाळेवरील शिक्षक सुरेशकुमार पेंटलवल्ली (५७) व त्यांचे मित्र पुजारी विजयकुमार भास्कर शर्मा नारायणम व चालक कार्तिक नागय्या कोंडा (दोघेही रा. व्यंकटेश्वरा कॉलनी, सरूरनगर, हैदराबाद) हे तिघे कारने (क्र. टीएस.०५-ईझेड.७८३९) शिर्डी येथे साई दर्शनासाठी गेले हाेते. दर्शन आटाेपून शनिवारी रात्री ते हैदराबादकडे परतत हाेते. रविवारी पहाटे तीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास ते उमरगा तालुक्यातील दाबका गावानजीक असलेल्या पेट्रोलपंपाजवळ पाेहाेचताच, कार अचानक बंद पडली. 

पुजारी नारायणम व चालक काेंडा यांनी कार सुरू करण्यासाठी बरेच प्रयत्न केले, मात्र, सुरू झाली नाही. शेवटी बंद कार ढकलत पेट्रोलपंपाच्या समाेर आणण्यात आली. यानंतरही जवळपास दीड ते दोन प्रयत्न केले. ताेवर पहाटेचे पाच वाजले. कार काही केल्या सुरू हाेत नसल्याचे लक्षात आल्यानंतर पुजारी विजयकुमार भास्कर शर्मा नारायणम हे पेट्रोल पंपावर मेकॅनिक भेटतो का? हे पाहण्यासाठी गेले, तर चालक काेंडा रस्त्यालगत बसलेले हाेते. याचदरम्यान शिक्षक पेंटलवल्ली यांनी कार सुरू करण्याचा प्रयत्न केला असता, अचानक भडका उडाला. अवघ्या काही क्षणात आगीने राैद्ररूप धारण केले असता, पेंटलवल्ली यांचा हाेरपळून मृत्यू झाला.

पेंटलवल्ली यांना बाहेर पडता आले नाही...कारने अचानक पेट घेतल्यानंतर मित्र कार्तिकने शिक्षक पेंटलवल्ली यांना कारच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीने राैद्र रूप धारण केल्याने त्यात यश आले नाही. आजूबाजूच्या लाेकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला असता, ताेवर पेंटलवल्ली यांचा हाेरपळून मृत्यू झाला.

मयताचे ‘डीएनए’ सॅम्पल घेतलेरविवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास मयताचा मुलगा, तसेच नातेवाईक घटनास्थळी पाेहाेचले. पाेलिसांनी घडलेल्या प्रकाराची त्यांना माहिती दिली. यानंतर फाॅरेन्सिक टीमने कारची तपासणी केली, तसेच वैद्यकीय पथकाने मयताचे ‘डीएनए’ नमुने घेतले आहेत.

दाेन्ही अंगाने पाेलिसांकडून तपासमयत शिक्षक सुरेशकुमार पेंटलवल्ली यांना कारने पेट घेतल्यानंतर दरवाजा उघडून बाहेर पडता आले नाही, असे मित्र कार्तिकने सांगितले असले तरी पाेलिस दाेन्ही अंगाने तपास करीत आहेत. कारने पेट घेतला तेव्हा नेमके हे दाेघेच बाहेर कसे हाेते? या प्रश्नाची पाेलिस उकल करीत आहेत.

टॅग्स :dharashivधाराशिवAccidentअपघात