शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलकांची पोलीस ठाण्यासमोर प्रातिनिधिक स्वरूपात दारूविक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 17:50 IST

अवैध दारूविक्रेत्यावर कारवाई करा

ठळक मुद्देसामाजिक शांतता भंग होण्याचे प्रकार वाढले स्थानिक रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.

कळंब : तालुक्यातील मोहा येथील अवैध दारूविक्री बंद करावी, या प्रमुख मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी रिपब्लिकन सेना व वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली मंगळवारी कळंब पोलीस ठाण्यासमोरील भागात प्रातिनिधिक स्वरूपात दारू विक्री आंदोलन करण्यात आले. या अनोख्या आंदोलनाची तालुक्यात चांगलीच चर्चा रंगली होती.

तालुक्यातील मोहा हे लोकसंख्या व आकाराने मोठे असलेले गाव आहे.येथील भीमनगरसह अन्य काही भागात अवैध दारूची सर्रास विक्री केली जात होती. याचा स्थानिक रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. तसेच वारंवार सामाजिक शांतता भंग होण्याचे प्रकार वाढले होते. यामुळे  संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायत, ग्रामसभा, पोलीस अधिक्षक, जिल्हाधिकारी व उत्पादन शुल्क विभागाला कळवून अवैध दारूविक्री बंद करावी अशी मागणी केली होती. याविषयी स्थानिकांनी जवळपास १२ अर्ज दिल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. वारंवार मागणी करुनही व तंटामुक्ती समिती ते ग्रामसभा असा दारू विक्री विरोधात आवाज उठवूनही मोहा येथील भीमनगर व गावातील इतर भागातील दारू विक्रेते जुमानण्यास तयार नव्हते. कारवाई गेल्यानंतर काही अवधीतच पुन्हा विक्री सुरू होत होती.

यामुळे रिपब्लिकन सेनेने मागच्या पंधरवड्यात मोहा येथील अवैध दारू विक्री बंद करावी अन्यथा पोलीस ठाण्याच्यासमोर दारू विक्री व उपोषण असे आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला होता. त्यानुसार मंगळवारी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल हजारे, वंचीत बहुजन आघाडीच्या युवक आघाडीचे तालुकाध्यक्ष लाखन गायकवाड, अरूण गरड यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी सकाळी नऊ वाजता कळंब पोलीस ठाण्यासमोरील येरमाळा रस्त्यालगत प्रातिनिधीक स्वरूपात दारू विक्री व उपोषण आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात रसुल पठाण,सुरज वाघमारे, बाबा कसबे, प्रविण कसबे, मनोज भुंबे, विशाल वाघमारे, शालन हिरवे, इंदुबाई कसबे, रूक्मिनी कसबे, मंदाबाई कसबे, आशा कसबे, विमल कसबे, आशा शिंदे आशा गाडे, सुशिला कसबे आदी मोठ्यासंख्येने सहभागी झाले होते.

आश्वासनानंतर आंदोलन मागे रिपब्लिकन सेना व वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली मोहा येथील अवैध दारूविक्री विरोधात कळंब येथे प्रातिनिधीक स्वरूपात दारू विक्री व उपोषण आंदोलन सुरू झाले. यात महिलांचा सहभाग उल्लेखनीय होता. शिवाय आंदोलनकर्त्यांनी दारूच्या रिकाम्या बाटल्या समोर मांडल्या होत्या. येथे दारू मिळेल असे ‘कॅन’ ठेवण्यात आले होते. यावेळी त्यांनी अवैध दारू विक्री बंद करावी, संबंधित व्यक्ति दाद नेत नसेल तर हद्दपार करावे अशा आग्रही मागण्या केल्या. शेवटी दुपारच्या सुमारास पोनि तानाजी दराडे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली व निवेदन स्विकारले. तसेच कारवाईचे आश्वासन दिले. यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

टॅग्स :agitationआंदोलनOsmanabadउस्मानाबादalcohol prohibition actदारुबंदी कायदा