शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

तुळजाभवानी देवीच्या द्वारासमोरील आंदोलन जमावबंदी आदेशाने गुंडाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2020 15:06 IST

तुळजाभवानी महाद्वारासमोर आध्यात्मिक समन्वय आघाडीने राज्यातील साधू-संतांच्या उपस्थितीत गुरुवारपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू होते.

ठळक मुद्देलढा सुरू ठेवण्याचा निर्धारभाजपची आध्यात्मिक आघाडी संतप्त

तुळजापूर (जि. उस्मानाबाद) : राज्यातील मंदिरे व प्रार्थनास्थळे उघडण्याच्या मागणीसाठी भाजपच्या आध्यात्मिक आघाडीने तुळजापुरात तुळजाभवानी मंदिरासमोर गुरुवारपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते. मात्र, मध्यरात्रीपासून मंदिर परिसरात जमावबंदी आदेश लागू केल्याने पोलिसांनी आंदोलनस्थळावरील तंबू रातोरात गुंडाळला. परिणामी, हे आंदोलनही तुळजापुरातून गंडाळले. मात्र, राज्यात अन्य ठिकाणी आंदोलन सुरूच राहणार असल्याचे आघाडीने स्पष्ट केले.

तुळजाभवानी महाद्वारासमोर आध्यात्मिक समन्वय आघाडीने राज्यातील साधू-संतांच्या उपस्थितीत गुरुवारपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू होते. शुक्रवारी आंदोलनस्थळी महाचंडीयाग यज्ञ करण्याचे नियोजन करण्यात आले होते; परंतु कोविडच्या पार्श्वभूमीवर महसूल प्रशासनाने मंदिर परिसरात कलम १४४ अन्वये जमावबंदीचे आदेश लागू केले. याबाबत आंदोलकांना नोटिसा देण्यात आल्या. दरम्यान, पोलिसांनीही हे आदेश लागू होताच रातोरात आंदोलन स्थळावरील तंबू गुंडाळला. यानंतर आंदोलकांनी पत्रकार परिषद घेऊन आपले आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न सरकारने केल्याची टीका करीत, यापुढेही हे आंदोलन राज्याच्या अन्य भागात सुरूच ठेवण्याचा निर्धार बोलून दाखविला. दरम्यान, शुक्रवारी आंदोलनासाठी आलेले अध्यक्ष तुषार भोसले यांच्यासह नगराध्यक्ष सचिन रोचकरी, विनोद गंगणे, विशाल रोचकरी, इंद्रजित साळुंके, नितीन काळे, आनंद कंदले, अविनाश गंगणे, संतोष बोबडे यांच्यावर जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी तुळजापूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही तर दडपशाही -तुषार भोसलेतुळजापुरातील आंदोलन मागे न घेता ते स्थगित केले असून राज्यातील सर्व मंदिरे जोपर्यंत उघडत नाहीत, तोपर्यंत राज्यभर समितीचे आंदोलन चालूच राहणार आहे, असे भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले  यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. राज्य शासनाच्या दडपशाहीचा निषेधही नाेंदवला. 

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादagitationआंदोलनTempleमंदिर