शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

उस्मानाबादेत ‘फिनॉमिनल हेल्थकेअर’च्या गुंतवणूकदारांचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 15:28 IST

हेल्थकेअर सर्व्हीसेसच्या कळंब शाखेत अनेकांनी गुंतवणूक केली आहे़ मात्र, शाखेला टाळे लागले असून, गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे़

उस्मानाबाद : मुंबई येथील फिनॉमिनल हेल्थकेअर सर्व्हीसेसच्या कळंब शाखेत अनेकांनी गुंतवणूक केली आहे़ मात्र, शाखेला टाळे लागले असून, गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे़ या शाखेत गुंतविलेले पैैसे  मिळावेत, या प्रकरणाचा विशेष पथकाकडून तपास करावा, आदी मागण्यांसाठी गुंतवणूकदारांनी मंगळवारी महात्मा गांधी जयंती दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले.

कळंब येथील सुधीर शिंदे यांच्यासह भूम, परंडा, बार्शी, कळंब, तुळजापूर व परिसरातील अनेक ठेवीदारांनी फिनॉमिनल हेल्थकेअर सर्व्हीसेसमध्ये गुंतवणूक केली आहे़ मुदतीनंतर वेळोवेळी पाठपुरावा करूनही पैसे परत न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे गुंतवणूकदारांच्या लक्षात आले़ या प्रकरणात कळंब पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे़ फिनॉमिलन हेल्थकेअर सर्व्हीसेसच्या संचालकांची मालमत्ता जप्त करावी, या प्रकरणाचा तपास विशेष पथकामार्फत करावा, चेअरमन, संचालकांचे पासपोर्ट रद्द करावेत, गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळवून द्यावेत, आदी मागण्यांसाठी मंगळवारी गांधी जयंतीदिनी उस्मानाबाद येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

या उपोषणात सुधीर शिंदे यांच्यासह कळंब येथील विजय जोशी, बार्शी येथील वसंत आवरे, डी़एस़देशपांडे, उपळा येथील आबा पाटील, भातंब्रा येथील अनिल मोहीर, तुळजापूर येथील प्रभाकर इंगळे, सदाशिव पौळ, प्रशांत इंगळे, मुरलीधर देवडीकर, भाटशिरपुरा येथील हरिचंद्र सिरसठ यांच्यासह असंख्य गुंतवणूकदार सहभागी झाले आहेत़

टॅग्स :agitationआंदोलनOsmanabadउस्मानाबादfraudधोकेबाजी