शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

मराठा बांधव आक्रमक, कळंबमध्ये मुख्यरस्त्यावर टायर जाळले; रास्तारोकोमुळे वाहतूक ठप्प

By बाबुराव चव्हाण | Updated: February 14, 2024 13:55 IST

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे यांचे अंतरवली सराटी येथे पुनश्च आमरण उपोषण सुरू झाले आहे

कळंब (जि. धाराशिव) : मनोज जरंगे यांची प्रकृती खालावली आहे. असे असतानाही सरकार याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप करत संतप्त झालेल्या कळंब येथील सकल मराठा समाजाने बीड धाराशीव जिल्ह्याच्या सीमेवरील मांजरा नदी पुलावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे. विदर्भ , मराठवाडा , पश्चिम महाराष्ट्र यांचा कनेक्टिंग पॉईंट असलेल्या पुलावरील रास्ता रोकोमूळे वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत . आंदोलनस्थळी तणावपूर्ण वातावरण आहे .

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे यांचे अंतरवली सराटी येथे पुनश्च आमरण उपोषण सुरू झाले आहे . याचा पाचवा दिवस आहे, अन्नपाणी त्याग केलेल्या जरंगे पाटील यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे. या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठीच सोमवारी कळंब येथे आठवडी बाजाराचा दिवस असतानाही बंद पाळण्यात आला होता . आता सरकारने जरंगे पाटील यांच्या आंदोलनाकडे गांभिर्याने लक्ष द्यावे या मागणीसाठी कळंब येथे आज सकाळी साडेदहा वाजल्यापासून रास्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आले आहे .

यावेळी आंदोलनस्थळी मोठ्या संख्येने सकल मराठा समाजाचे आंदोलक उपस्थित आहेत . सरकारवर रोष व्यक्त करणार्‍या घोषणा दिल्या जात आहेत . नायब तहसीलदार मुस्ताफा खोंदे , मंडळ अधिकारी टी.डी.मटके यांच्यासह मोठा पोलिस बंदोबस्त याठिकाणी ठाण मांडून आहे.

प्रमूख रस्त्यावर नाकाबंदी ...कळंब येथील मांजरा नदीवरचा पूल हा कळंब अंबाजोगाई , परळी तसेच कळंब केज धारूर माजलगाव , कळंब येरमाळा बार्शी अशा राज्य , राष्ट्रीय महामार्गाला कनेक्ट आहे. विदर्भाला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणार्या शेगाव पंढरपूर मार्ग याच पुलावरून जातो. नेमका याच पुलावर रास्ता रोको आंदोलन सुरू आहे . यामुळे मोठ्या वर्दळीच्या मार्गावर एकाअर्थाने नाकाबंदी झाली आहे .

टायरची जाळपोळ , वाहनांच्या रांगा ...दरम्यान , आंदोलनस्थळी टायर जाळण्यात आले आहेत . यामुळे जाळ अन् धुराचे लोट निघत आहेत. कळंब शहराकडे व नदीपल्याडच्या केज तालुका हद्दीत तीन किलोमीटरपेक्षा जास्त वाहनांच्या रांगा लागल्या आहेत . जोरदार घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला जात आहे 

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादMaratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील