मेरा नंबर कब आयेगा?
उस्मानाबाद जिल्ह्यात १६ जानेवारी रोजी पहिली लस टोचण्यात आली. याच दिवशी तब्बल २१५ हेल्थवर्कर्सना लसीकरण झाले. यानंतर कोरोनाच्या लढ्यातील फ्रंटीयर्सना लस देणे सुरू झाले. यामध्ये विशेषत: महसूल, पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. १ मार्चपासून आता ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना तसेच ४५ ते ५९ वर्षांतील कोमॉर्बिड व्यक्तींनाही लस देण्यात येत आहे. तरीही ४ मार्चपर्यंत लसीचा पहिला डोस हा १२ हजार १०८ नागरिकांना देण्यात आलेला आहे. प्रशासनाच्या दफ्तरी जिल्ह्याची लोकसंख्या ही साडे सोळा लाख आहे. हे आकडे लक्षात घेता अद्याप १ टक्काही लसीकरण झालेले नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना विशेषत: तरुणांना मेरा नंबर कब आयेगा म्हणत प्रतीक्षा करावी लागणार असे दिसते.
दुसरा डोस घेण्याकडे कल....
लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर साधारणत: चार आठवड्यानंतर दुसरा डोस देण्यात येतो. त्यामुळे लसीकरण सुरू झाल्यापासून चार आठवडे पूर्ण झाल्यानंतर १५ फेब्रुवारीपासून दुसरा डोस देण्यास सुरुवात झाली आहे. १७ ते १८ दिवसांमध्ये चार आठवडे पूर्ण केलेल्या जवळपास ४ हजार नागरिकांपैकी ३१२८ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. पहिला व दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या एकूण १५ हजार २३६ इतकी झाली.