नियम माेडणे चालकांच्या अंगलट; सव्वा लाखाचा वाहनधारकांना दंड

By राजकुमार जोंधळे | Published: January 7, 2024 07:36 PM2024-01-07T19:36:44+5:302024-01-07T19:37:06+5:30

धाराशिव शहर वाहतूक शाखेची कारवाई...

action against drivers; fine of half a lakh to the vehicle owners | नियम माेडणे चालकांच्या अंगलट; सव्वा लाखाचा वाहनधारकांना दंड

नियम माेडणे चालकांच्या अंगलट; सव्वा लाखाचा वाहनधारकांना दंड

 धाराशिव : शहर वाहतूक शाखेच्या वतीने नियम माेडणाऱ्या वाहनांना चांगलाच दणका देण्यात आला आहे. नियामांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून १ लाख २१ हजार ७५० रुपयांचे तडजाेड शुल्क वसूल करण्यात आले आहे.

पाेलिसांनी सांगितले, धाराशिव शहर वाहतूक शाखेच्या वतीन आणि शहरातील विविध पाेलिस ठाण्यांच्या वतीने बेशिस्त, नियम माेडणाऱ्या वाहनधारकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. त्यांच्याविराेधात मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. धाराशिव शहरात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १६६ वाहनधारकांविराेधात कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून १ लाख २१ हजार ७५० रुपयांचे तडजाेड शुल्क वसूल करण्यात आले आहे.

धाराशिव शहरात वाहन तपासणी माेहीम...
धाराशिव शहर वाहतूक शाखा आणि पाेलिस ठाण्यांच्या पथकांकडून चाैकाचाैकासह प्रमुख मार्गांवर वाहनांची तपासणी करण्यात आली. यावेळी बेशिस्त वाहनधारकांसह इतर नियम माेडणाऱ्यांना दंडाचा दणका देण्यात आला आहे. १६६ वाहनधारकांकडून दंड वसूल केला असून, नियम माेडणे वाहनचालकांना चांगलेच अंगलट आले आहे.

Web Title: action against drivers; fine of half a lakh to the vehicle owners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.