चौघांवर कारवाई
ढोकी : येथील पोलीस ठाण्याच्या पथकाने गावातील मारूती मंदिर चौकात चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी कमलाकर धावारे, दामोदर कोकाटे, प्रवीण पाटील व उमेश धावारे हे जुगाराचे साहित्य व रोख रकमेसह आढळून आले. त्यांच्याविरुद्ध ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
देशी दारू जप्त
उस्मानाबाद : तालुक्यातील बेंबळी पोलिसांनी भंडारी येथे छापा टाकून मंगेश बरबडे (रा. आरणी, ता. लोहारा) याच्याकडून देशी दारू जप्त केली. ही कारवाई २७ डिसेंबर रोजी करण्यात आली. याप्रकरणी बरबडे याच्याविरुद्ध बेंबळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पानटपरीत दारू विक्री; गुन्हा दाखल
नळदुर्ग : पानटपरीत दारूची विक्री करणाऱ्याविरुद्ध येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुळजापूर तालुक्यातील मानमोडी येथील शिवाजी कदम हे २७ डिसेंबर रोजी गावातील त्यांच्या पानटपरीत देशी दारूच्या बाटल्यासह मिळून आले. त्यांच्याकडून हा मुद्देमाल जप्त करून नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.