ग्रामीण भागातील रुग्णांची ने-आण करण्यासाठी प्राथमिक आराेग्य केंद्रांना रुग्णवाहिका पुरविण्यात आल्या आहेत; परंतु यापैकी अनेक रुग्णवाहिका कालबाह्य झाल्या आहेत. असे असतानाही अशा रुग्णवाहिकांतून रुग्णांचा प्रवास सुरू आहे. हा धक्कादायक प्रकार ‘लाेकमत’ने उजेडात आणल्यानंतर अध्यक्षा अस्मिता कांबळे यांनी सरकारकडे तेराव्या वित्त आयाेगाचा अखर्चित निधी व चाैदाव्या वित्त आयाेगाच्या निधीवरील व्याजाच्या रकमेतून रुग्णवाहिका खरेदीस मंजुरी द्यावी, अशी मागणी केली हाेती. तसे पत्रही ग्रामविकास विभागाला दिले हाेते. सततच्या पाठपुराव्यानंतर शासनाने ३ काेटी २० लाखांतून २० रुग्णवाहिका खरेदीस अनुमती दिली. ही मंजुरी मिळताच आराेग्य विभागाकडून प्रक्रिया सुरू करण्यात आली हाेती. शासनाला रितसर प्रस्ताव पाठविण्यात आला, परंतु या प्रस्तावास त्रुटींचे ग्रहण लागले आहे. रुग्णवाहिकांसाठी लागणारे चालक व इंधनाचे काय नियाेजन केले, असा सवाल सरकारकडून उपस्थित करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेकडून या त्रुटींची पूर्तता केल्यानंतर रुग्णवाहिका खरेदीचा मार्ग सुखकर हाेणार आहे, हे निश्चित.
रुग्णवाहिका खरेदीच्या प्रस्तावाला त्रुटींचे ग्रहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:35 IST