उमरगा - लाेहारा-उमरगा तालुक्यातील विविध गावांच्या पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेण्यासाठी ज्ञानराज चौगुले यांनी मंगळवारी पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्या दालनात भेट घेऊन जलजीवन मिशन आराखड्यास गती देण्याची मागणी केली.
उमरगा-लोहारा मतदारसंघातील जवळपास सर्व गावांमध्ये नवीन पाणीपुरवठा योजना राबविणे किंवा आवश्यक त्या ठिकाणी जुन्या पाणीपुरवठा योजनेची दुरुस्ती करणे आदी कामांच्या आराखड्यास जलजीवन मिशनअंतर्गत मंजुरी मिळालेली आहे. या आराखड्यानुसार अंमलबजावणीसाठी किंवा या आराखड्यास गती देण्यासाठी या आराखड्यातील प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी तातडीने मागून घेणे आवश्यक आहे. दरम्यान, जुन्या आराखड्यात राष्ट्रीय पेयजल योजनेतील ९ गावांचाही समावेश करण्याची गरज पाणीपुरवठामंत्री पाटील यांच्यासमाेर मांडली.
चाैकट...
या गावांना नवीन पाणी याेजनांची गरज...
गुंजोटी, दयानंदनगर तांडा, कोळसूर क., नाईचाकूर, पेठसांगवी, कलदेव निंबाळा, कवठा, मातोळा, त्रिकोळी, कराळी, बाबळसूर, तर लाेहारा तालुक्यातील खेड, जेवळी (उ), जेवळी (द), सास्तूर, होळी, सालेगाव (द), मोगा (बु.) या गावांतील याेजनांना प्राधान्यक्रमाने नवीन याेजना देण्याची गरज आहे.
केसरजवळगा, आष्टा ज., बलसूर, गुरुवाडी-चेंडकाळ, जवळगा बेट, एकुरगावाडी, तुरोरी, बेळंब, फनेपूर, भोसगा, भातागळी, मार्डी, तोरंबा या गावांतील पाणी याेजनांच्या दुरूस्तीची कामे तातडीने हाती घेणे गरजेचे असल्याचेही आ. चाैगुले यांनी पाणीपुरवठा मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.