शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

उस्मानाबादच्या शेतकऱ्याने घेतले विधानभवनाबाहेर पेटवून;पोलिसांच्या हस्तक्षेपाने अनर्थ टळला

By चेतनकुमार धनुरे | Updated: August 23, 2022 14:57 IST

यापूर्वी सुभाष देशमुख यांनी तहसील, जिल्हाधिकारी कार्यालय किंवा पोलिसांकडे कधीही कोणती तक्रार केल्याचे रेकॉर्ड उपलब्ध नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

वाशी (जि.उस्मानाबाद) : उस्मानाबाद जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने मंगळवारी दुपारी स्वत:ला विधानभवनाबाहेर पेटवून घेतल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी वेळीच आग विझविल्याने पुढील अनर्थ टळला. शेतजमिनीच्या कौटुंबिक वादातून या शेतकऱ्याने हे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे.

सुभाष भानुदास देशमुख असे पेटवून घेतलेल्या शेतकऱ्याचे नाव असून, मूळचे ते उस्मानाबाद जिल्ह्यातील तांदुळवाडी येथील रहिवासी आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून ते मुंबईतच वास्तव्यास आहेत. त्यांच्या कुटूंबाकडे वडिलोपार्जित १६ एकर जमीन आहे. सुभाष देशमुख यांना इतर चार भाऊ होते. त्यापैकी एकजण अंध होते. काही वर्षांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याने उर्वरित चार भावंडांमध्ये प्रत्येकी ४ एकर जमिनीची वाटणी झालेली आहे. सुभाष देशमुख यांच्या वाट्याला आलेली ४ एकर जमीन हे त्यांचेच एक भाऊ कसतात. दरम्यान, वाटणीत बदल करण्याची मागणी, सुभाष देशमुख करीत होते. यातूनच त्यांनी हे पाऊल उचलले असावे, अशी शंका तांदुळवाडी स्थानिकांनी व्यक्त केली. तर त्यांच्या एका पुतण्याने नेमके कशासाठी त्यांनी हे केले, याची महिती नसल्याचे सांगितले. दरम्यान, यापूर्वी सुभाष देशमुख यांनी तहसील, जिल्हाधिकारी कार्यालय किंवा पोलिसांकडे कधीही कोणती तक्रार केल्याचे रेकॉर्ड उपलब्ध नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

प्रकृती धोक्याबाहेरसुभाष भानुदास देशमुख यांनी विधानभवनाबाहेर अचानक पेटवून घेतले. यावेळी पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांच्या हे निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ आग विझवत त्यांना रुग्णालयात दाखल केले. यामुळे पुढील अनर्थ टळला. देशमुख यांची प्रकृती स्थिर असून २० ते ३० टक्के भाजल्याची माहिती आहे. 

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र