शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

जागरण गोंधळाच्या कार्यक्रमातील जेवणातून ७० जणांना विषबाधा, सर्वांची प्रकृती स्थिर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 13:28 IST

ग्णांमध्ये लहान मुलांपासून वृद्धांचा समावेश असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

उमरगा ( धाराशिव) : तालुक्यातील कराळी येथील ७० ग्रामस्थांना विषबाधा झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. रुग्णांवर सरकारी आणि खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. रुग्णांमध्ये लहान मुलांपासून वृद्धांचा समावेश असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

तालुक्यातील कराळी गावात एका कुटुंबाने मंगळवारी ( दि. १५) रात्री जागरण गोंधळाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी गावातील जवळपास अडीचशे ग्रामस्थांनी येथे जेवण केले. त्यानंतर दुसऱ्यादिवशी बुधवारी दुपारी काही ग्रामस्थांना उलटी, मळमळ, चक्कर येणे अशी लक्षणे दिसून आली. जवळपास ४० रुग्णांना तुरोरी येथील विजय क्लिनिक येथे दाखल करण्यात आले. त्यानंतर याबाबतची माहिती आरोग्य विभागाला देण्यात आल्यानंतर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमाकांत बिराजदार यांनी तात्काळ दवाखान्यास भेट दिली. रुग्णांची पाहणीकरून एक आरोग्य पथक कराळी गावात तपासणीसाठी पाठवले. 

दरम्यान, १६ जणांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. तर काहींवर गावातच उपचार सुरु केले आहेत. जवळपास ७० च्या आसपास विषबाधा झालेले रुग्ण आढळून आले असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे. काही रुग्णांना उपचारानंतर घरी पाठवल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमाकांत बिराजदार व तुरोरी येथील विजय क्लिनिकचे डॉ. विक्रांत शिंदे यांनी दिली.

सर्व रुग्णांची प्रकृती स्थिरकराळी येथे मंगळवारी जागरण गोंधळ कार्यक्रमातील जेवणातून विषबाधा झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यातील सर्व रुग्णांवर उपचार सुरू असून एक आरोग्य पथक कराळी गावातच ठेवण्यात आले आहे. सध्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. अन्नाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. - डॉ. उमाकांत बिराजदार, तालुका आरोग्य अधिकारी उमरगा

टॅग्स :food poisoningअन्नातून विषबाधाdharashivधाराशिव