कळंब (उस्मानाबाद ) : कंपनीचे काम देतो असे सांगून प्रत्येकी २ हजार रूपये सदस्यता फी घेवून कळंब येथील ४२ महिलांची ८४ हजार रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघा महिलांवर कळंब पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याविषयी कळंब पोलीस ठाण्यात उषा किसनराव शेळके(रा. गणेश नगर डिकसळ. कळंब) या टेलरकाम व्यावसायकरणाºया गृहिणींने फिर्याद दाखल केली असून यात त्यानी दिनांक ५ फेब्रुवारी रोजी त्यांच्याकडे साजीदा हुसेन शेख (रा. लोहारा) व साबीया मुनाप जमादार (रा. जळकोट ता. तुळजापूर) या दोन महिला आल्या अन् त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील एका व्यावसायिक कंपनीच्या आम्ही जिल्हा मॅनेजर असून व्यवसाय करण्यासाठी सदस्य व्हा असे सांगितले.
यासाठी ओळख व पुरावा म्हणून ओळखपत्र ही दाखवले. यानंतर शेळके यांची तालुका मॅनेजर म्हणून नेमणूक केली. यानंतर तुम्हाला महिना पन्नास हजार रुपये वेतन मिळेल. यासाठी शंभर महिला सदस्य द्यावे लागतील असे सांगितले. यावर शेळके यांनी ४२ महिलांचे प्रत्येकी दोन हजार रूपये साबीया जमादार यांच्या खात्यावर जूनमध्ये जमा केले. तत्पुर्वी वरील महिलांनी विश्वास यावा यासाठी परकर बनवण्याचे थोडे कामही दिले होते.
या सर्व महिलांनी मिळून ते काम पूर्ण करून दिले होते. यानंतर बरेच दिवस काम न आल्याने मागणी केली असता वेगवेगळी सबब सांगितली जात असे. यामुळे ओळखपत्रावरील कंपनीच्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधला असता तेथून जमादार या सध्या कंपनीत नाहीत, त्यांचे सोबत कसलेही व्यवहार करू नये असे सांगितले. यानंतर जमादार व शेख यांच्याशी पैशाबाबत विचारणा केली असता काम देवू अथवा पैसे परत देवू, असे सांगण्यात आले. परंतु आजवर पैसे परत मिळाले नाहीत. उपरोक्त आशयाच्या फियार्दीवरून ४२ महिलांचे ८४ हजार रुपरूे काम देण्याचे आमिष्ज्ञ दाखवून जमा करून घेतले, परंतु काम न देता फसवणूक केल्याप्रकरणी साजीदा हुसेन शेख व साबीया मुनाप जमादार यांच्याविरुद्ध कलम ४२० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.