शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
3
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
4
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
5
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
6
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
7
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
8
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
9
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
10
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
11
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
12
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
13
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
14
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
15
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
16
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
17
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
18
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
19
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
20
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना

सरकारी जमिनीवर विमा भरून सरकारलाच ३ कोटींना गंडविले; २४ सीएससी चालकांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2024 18:17 IST

खरीप हंगाम २०२३ मध्ये राज्य शासनाने शेतकऱ्यांना केवळ १ रुपयात विमा भरण्याची सुविधा दिली होती.

धाराशिव : मागील खरीप हंगामात धाराशिव जिल्ह्यातील सरकारी जमिनीवर शेतकऱ्यांच्या नावे विमा हप्ता भरला गेल्याची बाब उघडकीस आली आहे. कृषी विभागाने चौकशी केल्यानंतर धाराशिवसह बीड, सोलापूर, परभणी, छत्रपती संभाजीनगर, नांदेड जिल्ह्यातील २४ सीएससी चालकांनी कोट्यवधींची भरपाई ढापण्यासाठी हा उद्योग केल्याचे स्पष्ट झाले. या संबंधितांवर धाराशिवच्या आनंदनगर ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खरीप हंगाम २०२३ मध्ये राज्य शासनाने शेतकऱ्यांना केवळ १ रुपयात विमा भरण्याची सुविधा दिली होती. शेतकरी हिस्सा जितका असेल तो राज्य शासनच भरणार असल्याचे जाहीर केले होते. ही संधी साधत पाच जिल्ह्यातील २४ सीएससी चालकांनी धाराशिव जिल्ह्यात असलेल्या २ हजार ९९४ हेक्टर सरकारी जमिनीवर ११७० शेतकऱ्यांच्या नावाने विमा हप्ता भरला. निर्णयाप्रमाणे राज्य सरकारने या शेतकऱ्यांचा विमा हिस्सा ३ कोटी १३ लाख ७१ हजार ६३५ रुपये विमा कंपनीकडे जमा केला. दरम्यान, विमा कंपनीकडून अग्रीम वाटपाची प्रक्रिया सुरू झाली तेव्हा सरकारी जमिनीवरही विमा भरला गेल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आले.

ही बाब जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत उपस्थित केल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांना चौकशी करून गुन्हे दाखल करण्याच्या सूचना केल्या. या अनुषंगाने केलेल्या चौकशीत तथ्य आढळून आल्यानंतर ६ मार्च रोजी कृषी उपसंचालक बाबासाहेब वीर यांनी आनंदनगर ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी २४ जणांवर शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्रीगणेश कानगुडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

आरोपी केंद्रचालक सहा जिल्ह्यातील...संग्राम प्रभू मुरकुटे, राहुल शिवाजी चाटे, रवी नारायण पुरी, लक्ष्मण विनायक आघाव, महादेव गणपती वरकले, कृष्णा बालाजी आंधळे, महेश सोमनाथ बुरांडे, गजानन व्यंकट होळंबे, अजय दत्तात्रय गुट्टे, विश्वनाथ व्यंकट आघाव, अमर सुभाषराव देशमुखे, धनराज महादेव होळंबे, रवींद्र दामोदर मुंढे, नंदनी रावसाहेब होळंबे, विष्णू महादेव नागरगोजे, विजय गिरीधारी फड (सर्व जि.बीड), कृष्णा राम आंधळे, कुणाल जयदेव मुळे (दोघेही जि. छत्रपती संभाजीनगर), संदेश वैजनाथ मुंढे, धनराज उत्तम चैधर (दोघे जि. परभणी), रघुनाथ प्रभू घोडके (जि. नांदेड), नावजी सौदागर अनभुले (जि. सोलापूर), पांडुरंग जयराम भाेगील व एक अज्ञात (जि. धाराशिव) अशी या आरोपींची नावे आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीCrop Insuranceपीक विमाOsmanabadउस्मानाबादAgriculture Sectorशेती क्षेत्र