शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद उपअभियंता, मैलकुलीस लाच घेताना रंगेहात पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2021 21:46 IST

जिल्हा परिषदेचे बांधकाम उपविभाग क्रमांक १ चा उपअभियंता व मैलकुली यांना ३० हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी मंगळवारी दुपारी ४.३० वाजता रंगेहात पकडले.

अमरावती - जिल्हा परिषदेचे बांधकाम उपविभाग क्रमांक १ चा उपअभियंता व मैलकुली यांना ३० हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी मंगळवारी दुपारी ४.३० वाजता रंगेहात पकडले.लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) ने ही कारवाई उपअभियंत्याच्या दालनात केली. उपअभियंता संध्या मेश्राम (४५) व मैलकुली अण्णा वानखडे (५३) असे लाच स्वीकारणाऱ्यांची नावे आहे. याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माहितीनुसार, थुगांव- खानापूर जोडरस्त्याच्या कामांच्या देयकांना मंजुरी आणि कुऱ्हा येथील हायमास्ट दिवे बसविण्याच्या कामांना आवंटित झालेल्या निविदेच्या करारनामा करून कार्यारंभ आदेश काढण्यासाठी दोघा

आरोपींनी ४० हजारांची मागणी केली. तडजोडीअंती ३० हजार रुपये देण्याचे निश्चित झाले. अण्णा वानखडे याने ३० हजार रुपये स्वीकरल्याचे निष्पन्न झाले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे अधीक्षक विशाल गायकवाड, अपर पोलीस अधीक्षक अरुण सावंत यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक गजानन पडघन, पोलीस कर्मचारी माधुरी साबळे, सुनील वऱ्हाडे, युवराज राठोड, अभय वाघ, चंद्रकांत जनबंधू यांनी केली आहे.

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणCrime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावती