शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

झवेरी बाजारातील लूट प्रकरण: चोरीची रोकड सव्वादोन कोटींवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2023 09:49 IST

Zaveri Bazar Loot Case: झवेरी बाजारातील बुलियन मार्केटमधील लूट प्रकरणात चोरीची रोख रक्कम सव्वादोन कोटींवर गेली आहे. यापैकी १ कोटी ९० लाख रुपये जप्त करण्यास पोलिसांना यश आले आहे

मुंबई : झवेरी बाजारातील बुलियन मार्केटमधील लूट प्रकरणात चोरीची रोख रक्कम सव्वादोन कोटींवर गेली आहे. यापैकी १ कोटी ९० लाख रुपये जप्त करण्यास पोलिसांना यश आले आहे तर या प्रकरणातील फरार आरोपी अकबर, राजा आणि फईम यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी त्यांच्याकडे अधिक तपास सुरू आहे.

येथील खाऊ गल्लीमध्ये व्हीबीएल बुलियन नावाने सोने दागिने खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या विराट माली या व्यावसायिकाला ‘टार्गेट’ करत सहाजणांच्या टोळीने २३ जानेवारी रोजी ईडीचे अधिकारी बनून ३ किलो सोने आणि रोख रकमेची चोरी करून पसार झाले होते. ज्या कारमधून चोरटे पसार झाले ती कारही पोलिसांनी जप्त केली आहे. याप्रकरणी सुरुवातीला मास्टरमाईंड डोंगरीतील रहिवासी मोहम्मद फजल सिद्दीक गिलीटवाला (५०) याच्यासह मालाडमधील रहिवासी मोहम्मद रजी अहमद मोहम्मद रफीक उर्फ समीर (३७) आणि रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील रहिवासी असलेल्या विशाखा मुधोळे हिला अटक केली आहे. 

तिन्ही आरोपी पोलिसांच्या कोठडीत आहेत. सुरुवातीला २५ लाखांच्या रोख रकमेचा उल्लेख दाखल गुन्ह्यात होता. मात्र, राजस्थानला गेलेले विराट माली यांनी मुंबईत येत चौकशी करताच एकूण २ कोटी २५ लाख रुपयांची रोख रक्कम चोरीला गेल्याचे सांगितले. त्यानुसार, पोलिसांनी १ कोटी ९० लाख रुपयांची रक्कम हस्तगत केली असून, उर्वरित रकमेचा शोध सुरू आहे. 

आरोपी निघाली माजी नगरसेवकाची पत्नी    खेडमधील रहिवासी असलेल्या मुधोळे हिचे पती नगरसेवक होते. त्यांचे सहा महिन्यांपूर्वीच कॅन्सरमुळे निधन झाले. त्यानंतर आर्थिक चणचण असल्याने ती या आरोपींसोबत लुटीच्या कटात सामील झाली.     तिच्या सहभागामुळे आरोपींना कामगारांवर दबाव टाकण्यात मोठी मदत झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या कटाचा मुख्य सूत्रधार फजल याची ती मैत्रीण असून, फजल याने तिला लुटीतील वाटा देण्याचे कबूल केले होते.     तिच्याकडून १० हजारांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. 

दुसरा गुन्हा दाखलदोन ठिकाणी ही चोरी झाल्यामुळे एल. टी. मार्ग पोलिसांनी टोळीविरोधात दुसरा स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबई