शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मॉडेल बनविण्याचे आमिष दाखवत तरुणाची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 04:58 IST

एका बड्या मोबाइल कंपनीच्या जाहिरातीत मॉडेल म्हणून काम देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या निर्मात्याला पार्कसाईट पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. धवल जयंत व्यास (३२) असे आरोपीचे नाव आहे.

मुंबई : एका बड्या मोबाइल कंपनीच्या जाहिरातीत मॉडेल म्हणून काम देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या निर्मात्याला पार्कसाईट पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. धवल जयंत व्यास (३२) असे आरोपीचे नाव आहे.विक्रोळीच्या पार्कसाईट परिसरात तक्रारदार तरुण राहण्यास आहे. त्याला एका तरुणीने संपर्क साधला. एका बड्या मोबाइल कंपनीच्या जाहिरातीत मॉडेल म्हणून काम देण्याबाबत चर्चा केली. पुढे निर्माता जयंत धवलला संपर्क साधण्यास सांगितले. त्याने धवलची भेट घेतली. तेव्हा, धवलने आर्टिस्ट कार्डसाठी १० हजार रुपये घेतले.आर्टिस्ट कार्ड येताच तुझी निवड केली जाईल, असे सांगून तो नॉट रिचेबल झाला. त्यामुळे तरुणाने पार्कसाईट पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून धवलचा शोध सुरू केला.धवल दहिसर येथील रहिवासी असल्याची माहिती मिळताच, पार्कसाईट पोलिसांनी त्याच्या घरी छापा मारला आणि त्याला बेड्या ठोकल्या. त्याने आईकडे दिलेली १० हजार रुपयांची रोकडही पोलिसांनी ताब्यात घेतली. तो खरेच निर्माता आहे का? त्याने आतापर्यंत अशा प्रकारे किती जणांची फसवणूक केली आहे? या प्रकरणी पार्क साईट पोलीस धवलकडे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हा