शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
3
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
4
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
5
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
6
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
7
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
8
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
9
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
10
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
11
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
12
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
13
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
14
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
15
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
16
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
17
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
18
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
19
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
20
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."

प्रेमसंबंधातून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रेयसीच्या प्रयत्नामुळे मिळाला मदतीचा हात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2021 00:11 IST

कुटुंबीयांचा विरोध : मंगळवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास वाशी खाडीपुलावर ही घटना घडली.

नवी मुंबई :कुटुंबीयांनी प्रेमविवाहाला विरोध केल्याने प्रियकराने खाडीपुलावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. या वेळी तिथे उपस्थित प्रेयसीने वेळीच पोलिसांना कळवून मदत मागितल्याने त्याचे प्राण वाचले आहेत. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी दोघांच्या कुटुंबीयांना बोलावून त्यांचे समुपदेशन केले आहे.

मंगळवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास वाशी खाडीपुलावर ही घटना घडली. मानखुर्द येथील महाराष्ट्रनगर परिसरात राहणारे एक प्रेमी युगुल त्या ठिकाणी आले होते. दोघांमध्ये अनेक महिन्यांपासून प्रेम असून त्यांचे लग्नासाठी प्रयत्न सुरू होते. परंतु दोघांच्या घरच्यांनी त्यांच्या प्रेमसंबंधाला विरोध केला होता. त्यामुळे मंगळवारी रात्री दोघेही वाशी खाडीपुलावर भेटून चर्चा करत होते. या वेळी कुटुंबीयांकडून होत असलेल्या विरोधावरून दोघेही चिंतित होते. त्याचवेळी तरुणाने पुलावरून खाडीत उडी मारली. तो पाण्यात बुडत असतानाच तरुणीने तत्काळ पोलिसांना फोनवरून घटनेची माहिती दिली. त्यानुसार वाशी पोलीस, सागरी पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेत मच्छीमारांना मदतीसाठी बोलावले. त्यानुसार महेश सुतार व अभिषेक जैसवाल हे पोहोचले. त्यांनी पोलिसांसह बोटीने खाडीत पाहणी सुरू केली. या वेळी एक तरुण बुडताना आढळून येताच सुतार यांनी त्याला मदतीचा हात देऊन त्याचे प्राण वाचविले.

पालकांचे समुपदेशनया घटनेनंतर तरुण-तरुणीकडे चौकशी केली असता, त्यांच्या प्रेमसंबंधाला घरच्यांचा विरोध असल्याने तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समोर आले, असे वरिष्ठ निरीक्षक संजीव धुमाळ यांनी सांगितले. त्यामुळे दोघांच्या कुटुंबीयांना बोलावून समुपदेशन करून मुलांना पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

टॅग्स :PoliceपोलिसSuicideआत्महत्या