शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

बाळंतपणापूर्वी करावी लागली ‘ती’च्या सरणाची तयारी; मुंबईतील खळबळजनक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2022 09:46 IST

कुर्ला येथील घटना, अनैतिक संबंधांतून मावस दिरानेच केली हत्या

मुंबई : बाळंतपणासाठी मुलगी घरी येणार म्हणून कुटुंबीयांनी तयारी सुरू केली. कुठे बाबा तर कुठे आजी आजोबा होणार म्हणून कुटुंबीय आनंदात होते. मात्र, त्यापूर्वीच मुलीच्या हत्येची बातमी कानावर पडली आणि कुटुंबीयांना मुलीच्या बाळंतपणाऐवजी सरणाची तयारी करण्याची वेळ ओढावल्याची घटना कुर्ला परिसरात घडली. अनैतिक प्रेमसंबंधातून मावस दिरानेच बाळंतपणासाठी जाऊ नये म्हणून ८ महिन्यांच्या गर्भवतीची हत्या केली. याप्रकरणी कुर्ला पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. 

कुर्ला पश्चिमेकडील इंदिरानगर झोपडपट्टी परिसरात कोमल सोनकर (२०) कुटुंबीयांसोबत राहते. कोमल ८  महिन्यांची गर्भवती असल्याने घरामध्ये सगळे जण आनंदात होते. त्यामुळे तिच्या बाळंतपणाची तयारीची घरात लगबग सुरू झाली. गुरुवारी कोमल बाळंतपणासाठी आईकडे गावी जाणार होती. मुलगी घरी येणार म्हणून गावाकडे आईवडिलांनीही तिची येण्याची तयारी  केली होती. मात्र, बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास कोमलचा मृतदेह आढळला. घटनेची वर्दी लागताच कुर्ला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कोमलचा मृतदेह राजावाडी रुग्णालयात नेला. तेथे शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात गळा दाबून तिची हत्या केल्याची माहिती समोर आली. कोमलचे पती संजय यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवला. 

म्हणून केली हत्या अर्जुनचे कोमलसोबत अनैतिक संबंध होते. बुधवारी जेवणाच्या बहाण्याने अर्जुन घरी आला. २८ तारखेला कोमल बाळंतपणासाठी गावी जाणार होती. मात्र, अर्जुनने त्याला नकार दिला. यावरून दोघांमध्ये खटके उडाले. याच रागातून त्याने कोमलची गळा आवळून हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. यामध्ये कोमलच्या बाळाचाही मृत्यू झाला आहे. 

अशी झाली उकल कुर्ला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र होवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथके तयार करत आरोपीचा शोध सुरु केला. यामध्ये संजयचा मावसभाऊ अर्जुन दुपारच्या सुमारास घरी जेवणासाठी आला असल्याची माहिती पथकाला मिळाली. संजय आणि अर्जुन हे दोघेही कॉटन ग्रीन येथील एका चहाच्या दुकानात काम करतात. पथकाने अर्जुनचा शोध सुरु केला. त्याचा मोबाईल क्रमांक बंद लागल्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. त्याच्या मालकाकडे चौकशी केली तेव्हा, तो दोन हजार रुपये घेऊन गावी जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी गावाला पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला ताब्यात घेत चौकशी केली. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.