शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! लॉकडाऊनमध्ये दुरावलेल्या मैत्रिणीसोबत मित्रानं जवळीक साधल्यानं गळा दाबून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 08:11 IST

नाशिक येथून दोघांना अटक; दौघांपैकी एक अल्पवयीन

नवी मुंबई : लॉकडाऊनमुळे दुरावलेल्या मैत्रिणीसोबत जवळीक वाढवणाऱ्या मित्राचीच हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मृत मुलगा चार दिवसांपासून बेपत्ता असल्याने त्याचा शोध घेत असताना पोलिसांना गुन्ह्याचा उलगडा झाला. याप्रकरणी नाशिक येथून दोघांना अटक करण्यात आली असून, त्यात एक अल्पवयीन आहे.तळवली येथून अनिल शिंदे (१९) हा ५ फेब्रुवारीला सकाळी बेपत्ता झाला होता. याप्रकरणी तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी गांभीर्याने तपासाला सुरुवात केली होती. पोलिसांनी त्याच्या फोनवरील शेवटचे संपर्क शोधले असता नाशिक येथील एका तरुणाची माहिती समोर आली. यानुसार उपायुक्त सुरेश मेंगडे, सहायक आयुक्त विनायक वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक योगेश गावडे यांनी पथक तयार केले होते. त्यामध्ये निरीक्षक शिरीष पवार, उपनिरीक्षक उमेश गवळी आदींचा समावेश होता. त्यांनी नाशिक येथून अनिकेत जाधव (१९) याला ताब्यात घेतले होते. चौकशीसाठी त्याला पोलिस ठाण्यात आणले असता, त्याने अनिलची हत्या केल्याची कबुली दिली. त्यानुसार सोमवारी रात्री त्याने दाखवलेल्या ठिकाणावरून अनिलचा मृतदेह ताब्यात घेतला. घणसोली गावालगतच्या झाडीत हा मृतदेह टाकला होता. चार दिवसांपासून त्याठिकाणी त्याचा मृतदेह पडून होता. या गुह्यात त्याला साथ देणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.अशी घडली घटनाअनिकेत हा पूर्वी तळवली परिसरात राहायला होता. त्यावेळी एका मुलीसोबत त्याची घनिष्ट मैत्री होती; परंतु लॉकडाऊनमध्ये तो गावी गेल्यानंतर त्यांच्यात दुरावा निर्माण झाला होता.याचवेळी अनिलची त्या मुलीसोबत झालेली मैत्री अनिकेतला खटकत होती. यावरून त्याने साथीदारासह नाशिक येथे येऊन अनिलची हत्या करून पळ काढला होता. ५ फेब्रुवारीला दोघेही घणसोलीत आले असता त्यांनी एका व्यक्तीच्या मोबाइलवरून अनिलला फोन करून बोलावले. यानंतर त्याला दारू पाजल्यानंतर कोयत्याने वार करून हत्या केली होती.

टॅग्स :Murderखून