पिंपरी : देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला गुन्हे शाखेच्या खंडणी व दरोडा पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून पिस्तुलासह दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. अमोल सूर्यभान लवंडे (वय ३०, रा. गंधर्वनगरी, इंद्रलोक कॉलनी नंबर १, भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नावे आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, लवंडे याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती दरोडा पथकाला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून लवंडे याला ताब्यात घेतले असता, त्याच्याकडे २५ हजार ४०० रुपये किमतीचे देशी बनावटीचे एक पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे सापडली. ही कारवाई रविवारी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास हिंजवडीतील माने वस्ती येथील फोक्सवॅगन शोरूमसमोर करण्यात आली. लवंडे याच्यावर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल बढे करीत आहेत.
तरुणाकडे सापडली पिस्तुलासह दोन जिवंत काडतुसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 18:01 IST
पिंपरीत देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला गुन्हे शाखेच्या खंडणी व दरोडा पथकाने अटक केली आहे.
तरुणाकडे सापडली पिस्तुलासह दोन जिवंत काडतुसे
ठळक मुद्दे२५ हजार ४०० रुपये किमतीचे देशी बनावटीचे एक पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे